भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक करणा–र्याना तात्काळ अटक करा अन्यथा तिव्र आंदोलन करू – संजय वाघमारे

31

🔺बर्दापुरातील घटनेचा काॅंग्रेस पक्षाच्या वतीने तिव्र निषेध

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185

अंबाजोगाई – केज (दि.29ऑक्टोबर):- अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापुर येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर अज्ञात समाजकंटकांनी दि २७ रोजी रात्री महामानवाच्या पुतळ्यावर दगडफेक करून तोडफोड करत विटंबना केली आहे.

सदरील घटनेच्या निषेधार्थ आज दि २९ रोजी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा. ना.अनिल देशमुख यांना निवेदन देऊन सामाजिक सलोखा बिघडवून या पुरोगामी महाराष्ट्रात तणावाचं वातावरण तयार करु पहाणार्या समाजकंटकांना तात्काळ अटक करून गजाआड करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सदरील कृत्य करणाऱ्याना तात्काळ अटक न केल्यास लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची व पोलीस प्रशासनाची राहील असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य समन्वयक संजय वाघमारे, अंबाजोगाई काँग्रेस चे माजी तालुकाध्यक्ष अॅड.अनंत जगतकर,मा. तालुकाध्यक्ष वसंतरावजी मोरे, अखिल भारतीय काँग्रेस चे अंबाजोगाई शहराध्यक्ष तारेखअली उस्माणी,माजी जिल्हा सरचिटणीस भगवानराव ढगे, जेष्ठ नेते बाळासाहेब जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.