राज्यातील सात आदिवासी आश्रमशाळा शिक्षकांना राष्ट्रीय नवोपक्रम पुरस्कार जाहीर

33

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.30ऑक्टोबर):-स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन (सर फाऊंडेशन ) महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ‘सर फाऊंडेशन टीचर इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड २०२०’ देशभरातील प्रयोगशील शिक्षक व क्षेत्रीय अधिकारी यांना जाहीर झाला आहे.

यामध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, विषय सहाय्यक, साधन व्यक्ती, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता डायट यांचा समावेश आहे. यात महाराष्ट्र राज्यातून ७ आदिवासी आश्रमशाळा शिक्षकांचा समावेश आहे.अशी माहिती सर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य समन्वयक हेमा शिंदे,बाळासाहेब वाघ,सिद्धराम माशाळे,नितीन केवटे यांनी दिली.

रवी जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन भारतीय प्रबंध संस्थान अहमदाबाद, हनी बी नेटवर्क, सृष्टी अहमदाबाद, डायट व शालेय शिक्षण विभाग यांच्यासमवेत विविध उपयुक्त उपक्रम प्राथमिक शिक्षणासाठी राबविले आहे.’एज्युकेशन इनोव्हेशन बँक’ या प्रकल्पांतर्गत हे अवार्ड जाहीर करण्यात आलेले आहे.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर ही निवड केली जाते.या पुरस्काराचे वितरण सर फाऊंडेशन डिसेंबरमध्ये राष्ट्रीय स्तरावरून कॉन्फरन्समध्ये होणार आहे.

यामध्ये नाशिक विभागातील श्री.तनवीर जहागीरदार(मु.अ) शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा मुंढेगाव,श्री.नितीन केवटे(प्रा.शि) शासकीय आश्रमशाळा तोरंगण,श्री.मधुकर घायदार(उ.मा.शि) शासकीय आश्रमशाळा कनाशी,श्री.जयसिंग वळवी(मु.अ) शासकीय आश्रमशाळा अक्कलकुवा,ठाणे विभागातील श्री.हेमंत चोपडे(मु.अ) चिंध्याचीवाडी,कु.स्नेहांकिता डाकवे(प्र.प) शासकीय आश्रमशाळा वाडेश्वर,नागपूर विभागातील श्री.संदिप शेंडे(प्रा.शि) शासकीय आश्रमशाळा कोलितमारा या ७ आश्रमशाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना इनोव्हेशन अवॉर्ड जाहीर झाल्याबद्दल आदिवासी विकास विभागातील आयुक्त,अपर आयुक्त,प्रकल्प अधिकारी,सहकारी शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. व भविष्यातील वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या.