बीड सह राज्यातील पशू संवर्धन झोपेचे सोंग सोडून विविध घटनेतील दुर्दैवी मृत झालेल्या पशुपालकांना तत्काळ मदत करणार का नाही?

81

🔸रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर यांचा सवाल

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114, 9404223100

गेवराई(दि.6नोव्हेंबर):-तालुक्यातील येथील अनेक शेतकरी बांधवांना पशुधन वाचवणे कठीण झाले असून अनेक शेतकरी शेळी, मैस,गाय, बैल सह अनेक वासरे,कार्ड अडी जनावरे मरण पावले आहेत अश्या अनेक ठिकाणी जाऊन लोकांच्या समस्या समजून घेतल्या असून याची माहिती संबंधित पशुवैद्यकिय अधिकारी यांना माहिती दिलेली असताना आजपर्यंत या शेतकरी बांधवांकडून माहिती मिळाली असता स्वतः परस्थिती पाहिली असून पशुसंवर्धन विभागाच्या वतीने कुठलेही पंचनामे,मदत, पुनर्वसन संदर्भात कुठलेही ठोस पावले उचलली नाहीत.

उलट पशुसंवर्धन विभागाच्या वार्षिक निधीचा उपयोग नेमका कुठल्या पशुपालकांना होतो याचा शोध घेतला पाहिजे लवकरात लवकर मरण पावली अश्या सर्व जनावरांचे पंचनामे करण्याचे काम सुरू करावे मिर्गाव सह बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अनेक पशुधन परतीच्या पावसात आलेल्या पुरात वाहून गेले, विजेच्या तारा पडल्याने मरण पावले.

आजाराने पशुधन मरण पावले याचा इलाज आजपर्यंत पशू वैद्यकीय यंत्रणा पशुधन वाचवण्यासाठी अपयशी ठरले आहे शेतकरी बांधवांचे पशुधन दगावली हे अतिशय दुःख वाटते यासाठी कुठलाही अधिकारी व लोकप्रतिनिधी लक्ष्य देत नाहीत हे वास्तव आहे येरवी भेटी देऊन गप्पा मारणारे नेते मात्र आमच्या गोरगरीब शेतकरी बांधवांना पशुधन विकास योजनेतून तत्काळ मदत करतील का असा प्रश्न मृत पशू पालक शेतकरी बांधवांना पडला आहे.

मिर्गाव सह राज्यातील शेतकरी बांधवांना तत्काळ करून मदत करावी अशी मागणीही रयत शेतकरी संघटना bप्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य सुनील ठोसर पाटील यांनी मीरगाव येथील मृत पावलेल्या पशू पालक शेतकरी बांधवांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे बैठकीत सांगितले असून तत्काळ पंचनामे करून मदत न मिळाल्यास पशू संवर्धन विभागाने तातडीने निर्णय घेतला पाहिजे.

नसता रोगात, विविध कारणाने दगावले असे पशुधन आपल्या कार्यालयात आणून ठिय्या आंदोलन करण्यात येईल यावेळी गावातील सर्व पशुपालक व वृध्द यांच्या समस्या समजून घेत अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना धीर देत रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मदतीपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही शासनाने शेतकरी बांधवांना वाऱ्यावर सोडले असून रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन करून जॉब विचारण्याची वेळ आली आहे.

प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य सुनील ठोसर यांनी गावात जाऊन लोकांच्या समस्या समजून घेतल्या यावेळी अर्जुन दगडू उमप, विठल बलिया, भागवत पगारे, मोहन झाकणे, शिवाजी उमप, शहादेव उमप, सदाशिव कांबळे, गोविंद उमप, अमोल गोडबोले, तुकाराम बालिया, सगरबई बळीया, संजय हुंबे, कैलाश परहाड, पांडुरंग उमप, अंकुश गोडबोले, गणेश परहाद, भास्कर जाधव, किसान उमप, भाऊसाहेब माखले, सुरेश गोडबोले, दत्ता राऊत, बाळू उमप,सोनू टाकले, सोपान धुमाख,शिंकला उमप, गयाबाई बलीया, सुमन उत्तम गायकवाड, महादेव गायकवाड, शिवाजी अर्जुनराव गोडबोले आदी शेतकरी महिला पशू पालक उपस्थित होते.

शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन स्वीकारले असून बीड सह राज्यातील रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी यांचेकडे माहिती पाठवा आम्ही आपणास मदत होईल यासाठी कायम रयत शेतकरी संघटना तुमच्या सोबत राहील शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत यावेळी रयत शेतकरी संघटनेचे रेवकि सर्कल प्रमुख कुंडलिक उर्फ बाळराजे जाधव, बीड जिल्हा सचिव प्रमोद डोंगरे, संपर्क प्रमुख पृथ्वी राज निर्मल, तालुका प्रमुख बाबुराव भोईटे, उपजिल्हा प्रमुख प्रदीप झोडगे, पवार भाऊ, महिला आघाडी दोडके ताई, भागवत वैद्य, माऊली नवले, भावी सभापती नवनाथ आडे सोशल मीडिया प्रमुख महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस परिवार तथा पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते सर्वांनी शेतकरी बांधवांना मदत होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.