“खाजगी शाळेत ऑनलाइन शिक्षण हा फी वसुलीचा मार्ग झाला आहे”

33

🔸मुकुंद किर्दत,(आम आदमी पार्टी प्रवक्ते व पुणे जिल्हा अध्यक्ष)यांचा आरोप

✒️बाळासाहेब ढोले(विशेष प्रतिनिधी)मो:-7875157855

पूणे(दि.11नोव्हेंबर):-आम आदमी पार्टीचे प्रवक्ते श्री. मुकुंद किर्दत यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातल्याा पालक संघटना आता आक्रमक झाल्या आहेत.पालकांनी आता निर्वाणीचा इशारा देत म्हटले आहे,’ एक तर आम्हाला विष द्या, नाहीतर मुलांना शाळेत अॅडमिशन द्या. पाच तास आॅनलाईन शाळे मुळे मुलांना त्रास होतो आहे.

आम्ही अर्ध्या पैशात घर चालवतो, तुम्ही शाळा का चालवू शकत नाही ? विद्यार्थी प्रिमायसेस वापरत नाहीत,लायब्ररी वापरत नाहीत, कंम्युटर वापरत नाहीत.तरी पुर्ण फी शाळा कशी काय मागते ? शिवाय अर्वाच्य भाषा वापरली.शाळांना कुठल्याही प्रकारची माणूसकी नाही काय?आता आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही.

सरकार ने शाळा सुरू केलेल्या नसतानाही आॅनलाईन शाळा घेऊन परिक्षा ही चालू केलेल्या आहेत आणि यानिमित्ताने फी वसुल करत आहेत. गरीब कुटुंबातील मुलांना परिक्षेलाही बसू दिले जात नाही. मुले डिप्रेशन मधे जात आहेत.’ गेल्या फेब्रुवारीपासून लाॅकडाउन मुळे अनेक पालकांना नोकरी नाही.जवळ पैसा नाही. अशा परिस्थितीत पुण्यातील खाजगी शाळा मात्र विद्यार्थी व पालकांना मानसिक त्रास देत असल्याने पुण्यातील लोकांमधे याबाबत तीव्र नाराजी दिसुन येत आहे.