कोरोना काळात संविधान प्रास्ताविकतेचे वाचन घरून व्हावे

96

🔸सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने यांचे आवाहन

✒️राहुल डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-9850801314

अहेरी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताला भारताचे संविधान सुपूर्द केले. संविधानाचे जपन व जतन करण्यासाठी कोरोनाच्या काळात सर्वांनी भारतीय संविधानाचे प्रस्ताविकतेचे वाचन घरी राहून करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने यांनी प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.

प्रसिद्धीपत्रकात सुरेंद्र अलोने यांनी नमूद केले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम घेऊन 2 वर्षे 11 महिने 18 दिवसात भारतीय संविधान तयार करून 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला अर्पित केले. असून भारतीय संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) असून संविधान म्हणजेच एकप्रकारे प्राणवायु आहे, त्यामुळे सर्वांनी संविधान प्रास्ताविकतेचे वाचन घरून करण्याचे आवाहन सुरेंद्र अलोने यांनी केले आहे.

संविधानात मानवीय जीवनातील मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, समता, स्वातंत्र्य, बंधुता , न्याय ही जीवन पद्धती दिली असून जीवनातील दुःख, दैन्य, प्रश्न, समस्या दूर करण्याचे सामर्थ्य संविधानात असल्याने भारतीय संविधान प्रास्ताविकतेचे वाचन घरून करण्याचे आवाहन प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने यांनी केले आहे.