आपली लढाई आपल्या मुलांच्या उज्वल शैक्षणिक भविष्यासाठी आहे

34

▪️नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक

आपण पदवीधर आहात. शिक्षणाचे महत्त्व जाणता. आपल्या मुलांना उत्तम व उच्च शिक्षण सरकारी शाळा व काॅलेज मधूनच मिळायला हवे असे आपल्याला वाटत नाही का❓

म्हणून आपण यावेळी आपल्या मुलांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करूनच मतदान करावे.

आजवर जे सत्तेत होते त्यांनी शिक्षणाचे बाजारीकरण केल्यामुळे उच्च व उत्तम शिक्षण सामान्य माणसाच्या हाताबाहेर गेले आहे.आपण परत त्यांनाच जर संधी दिली तर आपल्या मुलांच्या भविष्याची माती आपल्याच हाताने होईल.

आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी तत्परतेने धावणारा आणि व्यवस्थेशी भांडून आपल्या मुलांचे प्रश्न सोडवणा-या लढवैया तरूण अतुलकुमार दादा खोब्रागडेला समाजाने उभे केले आहे.

एससी, एसटी, विजेएनटी, ओबीसी विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न अतुलकुमार ने व्यवस्थेशी भांडून सोडवली आहेत.

विदर्भातील विद्यार्थ्यांना विदर्भातच उत्तम शिक्षण देणा-या सरकारी शाळा, काॅलेज असावे , स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असावे आणि विदर्भातच उत्तम नोकरीच्या संधी मिळायला पाहिजे हे ध्येय ठेवून हा तरूण निवडणुकीत उतरला आहे.

अतुलकुमारने आजवर केलेले काम लोकांनी बघितले आहे म्हणून अनेक संघटना, संस्थाचं पाठबळ या तरूणाच्या मागे स्वयंस्फुर्तीने उभे रहात आहे.

आपल्या मुलांचे शैक्षणिक भविष्य आपण अशाच व्यक्तीच्या हातात दिले पाहिजे जो त्यांची योग्य काळजी घेईल. आणि आज नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत अतुलकुमार दादा खोब्रागडे सारखा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समजणारा आणि सोडवणारा कोणी नाही.

म्हणून बॅलेट पेपर वर होणा-या या निवडणूकीत अतुलकुमार दादा खोब्रागडे या तरूणाच्या नावासमोरील चौकोनात  हा अंक लिहून आपल्या मुलांच्या शैक्षणिक भविष्याबद्दल निश्चिंत व्हा.

खुप लढलो बेकीने
आता लढूया एकीनेच✊