दैनिक कुलस्वामिनी संदेश वार्ताच्या दिवाळी विषेश अंकाचे उपनिरीक्षक भिमराव ग्यानोबा कांबळे यांच्या हस्ते नायगांव येथे प्रकाशन

64

✒️शिवानंद पांचाळ(नायगाव प्रतिनिधी)मो:-9960748682

नायगाव(दि.28नोव्हेंबर):-दैनिक कुलस्वामिनी संदेश वार्ताच्या दिवाळी विषेश अंकाचे प्रकाशन नायगांव पोलीस स्टेशन चे (पोलीस उप निरीक्षक) मा. भिमराव ग्यानोबा कांबळे साहेब यांच्या हस्ते नायगांव येथील दैनिक कुलस्वामिनी संदेश कार्यालयात प्रकाशन आले.या प्रसंगी कुलस्वामिनी संदेश चे नांदेड विभागीय संपादक संदिप कांबळे यांच्या हस्ते दंबग पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

असे उपनिरीक्षक मा.भिमराव ग्यानोबा कांबळे साहेब यांचा सत्कार करण्यात आला, उपनिरीक्षक भिमराव कांबळे साहेब यांनी कोवीड-१९ या जागतिक महामारी च्या संकटात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती यांच्या या कार्याचा सन्मान व्हावा म्हणून कंन्ट्रोल क्राईम अॅड इन्फोर्मेशन डिटेक्टिव ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे नांदेड जिल्हा प्रमुख शिवानंद पांचाळ नायगांवकर यांच्या हस्ते नुकताच काल नायगांव पोलीस स्टेशन येथे भिमराव कांबळे साहेबांना कोवीड-१९ योद्धा विषेश सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले होते.

यांना कोवीड-१९ योद्धा पुरस्कार प्रदान झाल्या बद्दल व यांच्या उल्लेखनीय कर्तव्य दक्ष कार्याबद्दल कुलस्वामिनी संदेश कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते, ईतर बांधव ,जेष्ठ नागरिकांनी उपस्थित राहून त्यांचावर शुभेच्छांचा वर्षाव केला,यावेळी सामाजिक कार्यकर्ते,राजेंद्र कांबळे,शिवानंद पांचाळ नायगांवकर, सचिन फुलारी, संभाजी पांचाळ, अंकुश गायकवाड देगावंकर.सुनिल पाटील शिंदे . सचिन गायकवाड देगावंकर विशल व्यवहारे प्रदीप नातेवाड ठाकूर सर उपस्थित होते.