आ.सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडी संपूर्ण ताकदीने केला प्रचार

32

🔸ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्म नियोजन

🔹पदवीधरांचा निर्धार सतीश चव्हाण पसंती क्रमांक 1 नेच जिंकणार

🔸समता नगर येथे गृहभेट फेरीचा समारोप झाला

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी वैजनाथ(दि.30नोव्हेंबर):-राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे उमेदवार आ.सतीष चव्हाण यांच्या प्रचारार्थ परळी शहरात प्रचारफेरी चे नियोजन करण्यात आले. प्रचारात महाविकास आघाडीने मुसंडी घेत भेटीगाठीवर भर व प्रत्यक्ष गृहभेटी घेण्यात आल्या.या संपर्क मोहीम व भेटींमुळे पदवीधर मतदारांचा समर्थनाचा निर्धार स्पष्ट दिसुन येत आहे. पदवीधर मतदारांना प्रत्यक्ष भेटल्या मुळे यंदा मतदानाची टक्केवारीही वाढणार आहे.

आजच्या प्रचारफेरीत वार्ड क्रमांक 10 व 11मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक, वल्लभ नगर, पंचशील नगर, कंडक्टर कॉलनी, विद्या नगर, माधवबाग, शारदा नगर, सोमेश्वर नगर, रेल्वे कॉलनी, भगवानबाबा चौक, इरिगेशन कॉलनी, हरिदास नगर, माऊली नगर, समता नगर, जलालपूर, शिक्षक कॉलनी, जिरगे नगर, प्रिया नगर, बँक कॉलनी, साई नगर येथे प्रचारफेरी काढून गृहभेटी घेण्यात आल्या.

या प्रचारफेरीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, काँग्रेसचे जेष्ठ नेते वसंत मुंडे, नगरसेवक शरद मुंडे, संजय फड, महादेव रोडे, सिनेट सदस्य प्रा. पी. एल. कराड ,कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बाबुभाई नंबरदार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते वैजनाथ सोळंके,शिवसेनेचे जेष्ठ नेते नारायण सातपुते, संजय देवकर, दत्ता सावंत,शिवसेनेचे जिल्हा संघटक रमेश चौंडे,सचिन स्वामी, रा.कॉ.चे दत्ताभाऊ सावंत,प्रा. रघुनंदन खरात,अमर टाकळकर, राधाकिशन साबळे, सुरेश गित्ते,एम. एस. चव्हाण, राजकुमार डाके,शंकर कापसे, राहुल ताटे,अमर देशमुख, जमील अध्यक्ष,रवी मुळे,सचिन मराठे,गिरीश भोसले,राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष अजय जोशी, कॉंग्रेसचे शेख अल्ताफ,शेख सिकंदर, जब्बार सेठ, रा.कॉ. नागरिक सेलचे अध्यक्ष के.डी. उपाडे, संजय देवकर, रामप्रभु मुंडे, समाधान जोगदंड, सुमंगल जोगदंड, रोहन कांबळे,शिक्षक नेते वसंत कांबळे,डी. जी. शिंदे, प्रा.सुनिल चव्हाण,लक्ष्मण वाकडे, अमोल कांबळे,नारायण वानखेडे, शेख जफर, प्रा.स्वामी, सत्यनारायण दुबे सर,विनोद देशमुख ,संजय सुरवसे, संजय वानखेडे,पप्पू काळे, रामकीशन टेकाळे, प्रल्हाद नखाते आदींसह महाविकास आघाडीचे नेतेगण नगरसेवक डॉक्टर्स वकील शिक्षक प्राध्यापक मोठ्या संखेने उपस्थित होते.