कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातील धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही तर केंद्र सरकारला सत्तेतून खाली खेचू – दत्ता वाकसे

35

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.30नोव्हेंबर):-गेल्या 70 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीचे आरक्षण प्रश्न धनगर समाज संघर्ष करत आहे त्याच बरोबर आता कर्नाटक राज्यातील धनगर समाज कुरबा समाज आरक्षणासाठी संघर्ष करत आहे परंतु कर्नाटक राज्यातील भाजप सरकार आणि महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीचे तात्काळ निर्णय घेऊन धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविला नाही.

तर महाराष्ट्रातील दोन कोटी धनगर समाज विकास आघाडीचे सरकार शिवाय शांत बसणार नाही असा देखील इशारा त्या ठिकाणी कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यात महाराष्ट्र राज्याच्या धनगर समाजाचे नेते दत्ता वाकसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये इशारा दिला.

यावेळी बागलकोट येथील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एटी यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी पुढे पत्रकार परिषदेत ते म्हणाले की कर्नाटक राज्यातील कुरबा धनगर समाजाला तात्काळ भाजप सरकारने आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लावल्यास कर्नाटक राज्यातील भारतीय जनता पार्टीचे सरकार पाडल्याशिवाय धनगर कुरूबा समाज शांत बसणार नाही.

वेळोवेळी शासनाकडे कुरबा समाजाने अनुसूचित जमातीच्या सवलती च्या संदर्भामध्ये मागणी केलेली आहे यावेळी वेळोवेळी धनगर समाज कुरबा समाजाला धावण्याचा काम भारतीय जनता पार्टीचे सरकार करत आहे त्यामुळे आगामी काळात भाजपला केंद्रातून पायउतार केल्याशिवाय महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील कुरुबा धनगर समाज केल्याशिवाय शांत बसणार नाही.

यावेळी या पत्रकार परिषदेमध्ये बागलकोट जिल्ह्याचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष ए टी पाटील यांच्यासह येथील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य उपस्थित होते वेळोवेळी केंद्र आणि राज्य सरकारकडे कर्नाटक राज्यातील कुरूबा धनगर समाज आणि महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज शेड्युल ट्रीपच्या आरक्षणाच्या संदर्भात तात्काळ अंमलबजावणी करावी यासाठी शासन दरबारी मागणी करत आहे परंतु शासन यांना वेळोवेळी निराश करत आहे.

त्यामुळे आगामी काळात कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचे अंमलबजावणी केली नाही तर कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील कुरबा धनगर समाज खूप मोठ्या प्रमाणात दिल्लीवर स्वारी करून देशपातळी स्तरावर खूप मोठे जनआंदोलन उभारणार असून आगामी काळात केंद्रातील भाजप सरकारने तात्काळ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा असे देखील यावेळी पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्याचे धनगर समाजाचे नेते दत्ता वाकसे यांनी म्हटले आहे.