चेक तळोधी आणि मौजा चेक पेल्लुर येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रम अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण आयोजित

26

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634

गोंडपीपरी(दि.5डिसेंबर):- दिनांक 5 डिसेंबर 2020 जागतिक मृदा दिना निमित्त गोंडपिपरी तालुक्यातून मौजा चेक तळोधी आणि मौजा चेक पेल्लुर येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रम अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य उपस्थित होते, तसेच तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक आणि शेतकरी बंधू उपस्थित होते… सदर कार्यक्रम पुढील प्रमाणे आयोजित करण्यात आला.

1. माती परिक्षणाची गरज, माती नमुना कसा घ्यावा यावर मार्गदर्शन केले..
2. मृद पत्रिका चे वाचन कसे करावे आणि त्यानुसार खताची मात्रा कशी द्यावी यावर मार्गदर्शन केले..
3. ऍग्रोवन वर्तमान पत्रा चे वाटप करून त्यातील जमीनीची सुपीकता वाढवण्याबाबत माहितीचे सामूहिक वाचन करण्यात आले….