रक्तदानाने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

    40

    ?खडसंगी येथे रक्तदान शिबिर

    ?बहुजन विचार बहूउद्देशीय संस्थेचा उपक्रम

    ✒️नेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    नेरी(दि.20फेब्रुवारी):-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा खडसंगी येथे रक्तदान करून युवकांच्या वतीने रक्तदान करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.

    बहुजन विचार बहु. संस्था यांच्या वतीने स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आले होते.प्रशासनाच्या आवाहनानुसार खडसंगी येथे साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करून शिबिराला सुरुवात करन्यात आली.

    या प्रसंगी पंचायत समिती सदस्य अजहर शेख, जेष्ठ नागरिक खुशाल मोहटे, माजी उपसरपंच प्रमोद श्रीरामे, माजी ग्रा. प.सदस्य प्रमोद राऊत,सामाजिक कार्यकर्ते दशरथ ननावरे उपस्थित होते.

    या शिबिरात वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांच्यासह परिसरातील ३८ रक्तदात्यांनी सहभागी होऊन स्वेच्छीक रक्तदान केलं.

    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीआशिष गजभिये, प्रशांत मेश्राम, प्रतीक औतकर,धीरज शंभरकर,मयूर मेश्राम, प्रतीक चिंचाळकर,प्रफुल गेडाम,रोशन खोंडे, राहुल तराळे,हर्ष रामटेके,सायल गेडाम, आदर्श वैद्य,पियुष रामटेके,शुभम ठाकूर,वैभव नन्नावरे,आयुष घाटे,पियुष गेडाम,योगेश आत्राम
    यांनी परिश्रम घेतले.