सेवा निवृत्ती कर्मचाऱ्यांचे गटविमा ची रक्कम मिळणार कधी

28

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.16मार्च):-नगर परिषद यथील सेवा निवृत्ती कर्मचाऱ्यांचे गटविमा रक्कम मिळण्यासाठी मुख्याधीकरी नगरपरिषद गंगाखेड यांना दिनांक १५/०३/२०२१ रोजी निवेदन देण्यात आले आहे आम्ही सेवानिवृत्ती कर्मचारी सन.२०१६ ते २०२०या कालावधी मध्ये सेवानिवृत्ती झालो आहोत त्यांचे गटविमा रक्कम आजपर्यंत मिळाली नाहीत कार्यालयात जावून पण काही उपयोग झाला नाही.

गटविमा कार्यालयात चोकशी केली असता त्यांचे असे म्हणने आहे की आपल्या कार्यालयाकडून गटविमाची रक्कम कार्यालयात जमा झाली नाही असे कळले या निवेदनावर खालील सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत सावंत नामदेव किशनराव,शे.गफार शे.माणिक,भीमराव कुंडलिकराव खरात, बाबरखा रहीमखा, पदमीनबाई नंदकुमार साळवे, स.निझाम स.हुसेन