वाडीपिर मध्ये जनता कर्फ्यू ला संमिश्र प्रतिसाद

28

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.12मे):- करवीर तालुक्यातील वाडीपिर गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पाहता माजी सभापती अश्विनी धोत्रे, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कोरोना दक्षता कमिटी यांनी एकत्रित येऊन पाच दिवस कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला अशी माहिती सरपंच आकाशी लाड व ग्रामसेवक निलेश कुंभार यांनी फोनवरून दिली.प्रत्यक्षात पाहता याला वाडीपीर गावातून नागरीकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून प्रतिसाद दिला मात्र काही नागरिक दवाखाना व लसीकरण या कारणाने संचार करत होते. गावामध्ये बंदोबस्त कडक होता. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना तो आवश्यक कारणासाठीच जात आहे का याची चौकशी ग्रामपंचायतीकडून नेमण्यात आलेल्या गार्ड यांच्याकडून केली जात होती.

मोटरसायकलवरून अनावश्यक फिरणाऱ्या चालकांना दंडात्मक कारवाई करण्यात आली.विशेष म्हणजे वाडीपीर गावचे उपसरपंच उत्तम शेळके यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य यशवंत सातपुते व सागर लाड, कोरोना दक्षता कमिटी सदस्य संदीप मिठारी, सागर टेळके, जयकर टेळके सुरेश लाड, समर खोत शिपाई सर्जेराव शेळके व राजू पोर्लेकर आदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सेवेत उपस्थित होती.यावेळी सदस्य यशवंत सातपुते यांनी सध्या स्थिती व लसीकरण उपलब्धतेबाबत येणारी अडचण याबाबत व्यथा व्यक्त करत शासनाने जाहीर केलेले धान्य नागरिकांना वेळेत मिळावे असे मत व्यक्त केले.