राज्यस्तरीय कोरोनायोद्धा समाजरक्षक महासन्मान 2021 जाहीर

24

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.16मे):- खामगाव येथिल श्री.मनोज नगरनाईक संपादक दिव्यांग शक्ती,वाशिम चे श्री संजय कडोळे संपादक कारज्य महात्मय व पालघर जिल्ह्यातील देवेंद्र मेश्राम दिव्यांग शक्ती पालघर जिल्हा प्रतिनीधी यांना जाहिर झाला आहे.

संपुर्ण राज्यात परिचीत असलेल्या विविध विधायक कामाने परिचीत असलेल्या अखिल महाराष्ट्र पत्रकार आणि पत्रलेखक संघ (रजि. ट्रस्ट) संस्थेच्या वतीने आणि विश्वात्मक मराठी साहित्य परिषद (द्वारा मविलोअ) यांच्या सहकार्याने संपन्न होणाऱ्या कोरोना योद्धा समाज रक्षक महासन्मान 2021 या ऑनलाईन उपक्रमामध्ये कोरोना संकटात केलेले उल्लेखनीय सामाजिक कार्य, रुग्ण सेवा, जनजागृती, प्रबोधनपर सेवा आणि आरोग्य विषयक प्रकल्प या गौरवास्पद कार्यासाठी खास महासन्मान मानपत्र ऑनलाईन सोहळ्यात मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्याचा निर्णय संयोजन समितीने घेतला आहे.

त्यानुसार कोविड योद्धा ऑनलाईन महासन्मान सोहळ्यासाठी मनोज नगरनाईक,संजय कडोळे व देवेंद्र मेश्राम यांचेसह ईतर मानकरी यांना महासन्मान मानकरी म्हणून निवड सुनिश्चित करण्यात आलीआहे.सन्मानसोहळा फक्त ऑनलाईन संपन्न होणार आहे असे एन. डी. वाणी (सचिव, मानकरी निवड समिती), कोविड योद्धा महासन्मान 2021संयोजक अखिल महाराष्ट्र पत्रकार आणि पत्रलेखक संघ (रजि. ट्रस्ट ) यांचेवतिने कळविण्यात आले आहे.