पार्ङी शिवारात जैवइंधन सेंद्रिय खत प्रकल्पाचे भूमिपूजन

36

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.17मे):- एम.सी.एल.कंपनी अंतर्गत सती क्लिनफ्यूएल्स प्राईव्हेट लिमिटेड या जैवइंधन व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाचा भुमिपुजन सोहळा १४ मे रोजी अक्षय तृतीया व ईदच्या मुहूर्तावर तालुक्यातील गणेशपुर-पार्ङी शिवारात पार पडला.

हरिभक्त परायण नारायण शिंदे महाराज खर्षीकर व कंपनीचे डायरेक्टर जगदिश पायघन यांच्या मातोश्री पार्वती तुकाराम पायघन यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला.

रससिंधु प्रोड्युसर कंपनीचे डायरेक्टर जगदिश पायघन यांनी प्रास्ताविक केले.ते म्हणाले की, पुसद तालुक्यातील गणेशपुर-पार्डी शिवारात उभारण्यात येणारा शेतातील कचऱ्यापासून बायो सी.एन.जी. व खतनिर्मितीचा हा प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यातील पहिलाच प्रकल्प आहे. राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत घडविण्याच्या दिशेने कंपनीचे हे पहिलेच पाऊल असून डॉ.कलाम यांचे शिष्य एम.सी.एल.चे संस्थापक डॉ. शाम घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प कार्यान्वित होत आहे .

कंपनीचे डायरेक्टर जगदिश पायघन यांनी प्रकल्पा विषयी माहिती दिली.या प्रकल्पात शेतातील टाकाऊ कचरा, गजराज गवत व घरगुती कचऱ्या पासुन जैविक इंधन व सेंद्रिय खतांची निर्मिती केली जाणार आहे.

संचालक डॉ. संजय मते यांनी सहकार्य करून दिवाळी पर्यंत कंपनी उभी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. नारायण महाराज शिंदे खर्षिकर यांनी आपल्या खास शैलीतून पर्यावरण पूरक प्रकल्प शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. शेतकऱ्यांनी या प्रकल्पात सभासद होऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस करण ढेकळे यांनी हा प्रकल्प शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करू शकतो, म्हणून सर्व शेतकरी बांधव यांनी या मध्ये सहभागी व्हावे, असे सांगितले.

यावेळी एमव्हीपीधारक शिवराम शेटे, मोहन तेलंगे, चंद्रकांत गोरे, पंढरी मारकड व प्रतिष्ठित शेतकरी प्रकाश गोरे माजी,पोलीस पाटील, विजय भोने, ज्ञानेश्वर वाठ,अल्का पोपळघट, संतोष अनखुळे, प्रशांत पोपळघट, रविंद्र पुंड यांनी आपले विचार व्यक्त करून प्रकल्प उभारणीसाठी शुभेच्छा दिल्या.

हा प्रकल्प प्रदूषण मुक्त असून पर्यावरण, रोजगार आरोग्य, शेती, शेतकरी .या दृष्टीने फायदेशीर असून या प्रकल्पाद्वारे ग्रामस्वच्छता होणार आहे. या प्रकल्पासाठी कच्चामाल म्हणून गावातील शेळी,मेंढी,गाय,बैल,म्हैस यांचे शेण,घरातील वाया जाणारे,अन्न,शेतातील कपाशीच्या काड्या,केळी,पपईचे खांब, निंदनाचे तण,तुटलेल्या फांद्या,धसकटे,काटेरी झुडपे,गजराज गवत कंपनी शेतकऱ्यांकडून हमी भावाने खरेदी करणार आहे.