राज्य सरकारच्या “सुंदर माझे कार्यालय” सर्व कार्यालयात राबविण्यात येईल- शासनाने काढले परिपञक

32

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

मुंबई(दि.19मे):-सुंदर माझे कार्यालय राज्य सर्व कार्यालयात राबविण्याबाबत नुकतेच दिंनाक 18 मे 2121 रोजी सामान्य प्रशासनाने शासन निर्णय क्रंमाक :प्रसुधा 1621/प्र.क्र.11/18 अ काढले या अभियानाचे स्वागत आहे. परंतु कार्यालय सुंदर ठेवणे व तेथील वातावरण प्रसन्न असण्याबरोबरच सभ्यही असले पाहिजे. त्यासाठी सर्व प्रथम अधिकारी वर्ग व कर्मचारी यांनी त्यासाठी आधी प्रत्येक कार्यालयात लावलेले नागरिकांना धमकी देणारे फलक काढायला हवेत..

कारण सर्वात प्रथम नागरिकाच्या नजरेत पडतो तो शासकिय कामात अडथळा, कार्यालयात गोंधळ करणे , जमाव आणणे असे अनेक कायदे लिहलेला बोर्ड पण शासकिय कार्यालयात कुठेच मि आपली काय मदत करु शकतो हा बोर्ड पाहण्यास मिळत नाही राज्यातील प्रत्येक कार्यालय हे स्वच्छ, सुंदर ब नीटनेटके असावे तसेच तेथील वातावरण नागरिकांसाठी सुलभ व कर्मचाऱ्यांसाठी काम करण्यायोग्य, प्रेरक, उत्साहवर्धक असावे यासाठी राज्यस्तर ते तालुका स्तरावर “सुंदर माझे कार्यालय” अभियान पुढील आर्थिक वर्षापासून प्रत्येक वर्षी दि. १ जानेवारी ते ३१ मार्च, १मे ते ३१ जुले ब १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर अश्या तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे.

या अभियानाची तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावरील पूर्वतयारी, अभियानाची विस्तृत रुपरेषा, अवलंब करावयाची कार्यपध्दती, तसेच अभियानातंर्गत पुरस्काराची निवड करताना विविध स्तरावरील पुरस्कार निवड समित्या, पुरस्कारासाठी विविध स्तरावर विचारात घ्यावयाच्या बाबी ब अभियानाची मूल्यांकन पध्दती याबाबत मार्गदर्शक तत्वे निश्‍चित करण्यासाठी औरंगाबदचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. समितीने या अभियानाबद्दल विस्तृत अहवाल दोन महिन्यात शासनाला सादर करावयाचा आहे.या अभियानाचं स्वागतच आहे मात्र राज्यातील प्रत्येक कार्यालयाच्या दर्शनी भागात नागरिकांनी काय केल्यास भारतीय दंड संहितेच्या कोणत्या कलमाचा भंग केल्यास काय शिक्षा होउ शकते याचे फलक लावलेले आहेत.

हे फलक बेकायदा आणि या देशाचे मालक म्हणजे नागरिक यांना धमकी देणारे आहेत.लोकशाहीमध्ये हे अजिबात अपेक्षित नाही. त्यामुळे हे फलक काढ्ले जाऊन त्याजागी ‘नागरिक या देशाचे मालक आहेत आणि त्यांचे सेवा हे आमचे परम कर्तव्य आहे‘ अशा अर्थाचे फलक लावले गेले पाहिजेत. तसेच शासकिय कर्मचारी यांची नागरिकाशी संवाद सांधतांना भाषा ही न्रम असावी माञ सरकारी कर्मचारी व अधिकारी यांची भाषा अतिश्य असभ्य व बेजाबदार पणे असते आपण ज्या कार्यालयात काम करतो त्या कार्यालयातील कर्मचारी यांचा पगार जनतेने भरलेल्या पैशातुन चालतो हे विसरु नये .