महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या खाजगीकरणाच्या विरोधात काळी फीत आंदोलनाचे नियोजन

32

🔹आर. एम. बी. के. एस. अंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शाखे च्या वतीने आंदोलनाचे नियोजन

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.1जून):-राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ ट्रेड युनियन अंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शाखेच्यावतीने दि. ७जून २०२१ ला महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे खाजगीकरण केल्या जात असल्याच्या कारणावरून व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोकर्‍या संपुष्टात आणल्या जात असल्याच्या कारणावरून काळीफीत बांधून आंदोलन केले जाणार आहे. हे आंदोलन महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या २५०आगारात, एकूण ३१विभागात, ३५८ तालुक्यात व 36 जिल्ह्यात काळी फीत बांधून आंदोलन केले जाणार आहे.

असे परमेश्वर खंदारे, भगवान हनवते, अविनाश भवरे,
अनिल तायडे , विनोद पाईकराव, बाबुराव मार्गमवार, ज्ञानेश्वर भालेराव, अंकुश नाटकर, सचिन वडनेरकर, रणजीत काळे, बाळू काळे, अशोक धुळधुळे, अमोल धुळधुळे, राहुल पाईकराव, शंकर इंगळे, सिद्धार्थ शेजुळे, शंकर ठाकरे, गजानन बोडखे, आशिष डहाडे, महादेव गायकवाड, पांडुरंग मस्के, भगवान सुरोशे, देविदास खडसे, अजय सोळंके, अमोल खंदारे, विक्रम राठोड आदींनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन पुसद तालुका संयोजक यांनी केले आहे.