दैनिक लोकपत्रच्या कार्यकारी संपादकावर झालेल्या हल्ल्याचा परळीत जाहिर निषेध

34

🔺हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करावी– भगवान साकसमुद्रे

✒️परळी प्रतिनिधी(अतुल बडे)

परळी(दि.1जून):-दैनिक लोकपत्रचे कार्यकारी संपादक रवींद्र तहकिक यांनी आपल्या सडेतोड लिखाणातून “शेंदाड नात्याचा भयताड पोऱ्या” या मथळ्याखाली वास्तव लिखाण केले होते. मात्र हे वास्तव लिखाण अंगाला झोंबल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समर्थकांनी दैनिक लोकपत्रच्या कार्यालयात जाऊन कार्यकारी संपादक रवींद्र तहकीक यांच्यावर भ्याड हल्ला करत काळे फासण्याचा पर्यंत केला. मात्र अशा भयताड हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत संपूर्ण मराठवाड्यात रस्त्यावर उतरून पत्रकार आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करतील, औरंगाबाद येथील सर्व पत्रकार बांधवानी असा प्रकार कधी वाढत राहील तर काय करणार असे सर्व महाराष्ट्रातील पत्रकार संघटना करत आहे. यावेळी हल्ला करणार्या वर गुण्हा दाखल केला आहे.

पोलीस स्टेशन, MIDC सिडको, औरंगाबाद शहर. गु.र.नं. २३३/२०२१ कलम १४३, १४७, १४९, ४४७, ३२३, ५०४ भादवि सहकलम पत्रकार संरक्षण अधिनियम २०१७ कलम ४ फिर्यादी रविंद्र विठ्ठलराव तहकीक वय ५१ वर्षे धंदा- दैनिक लोकपत्राचे कार्यकारी संपादक रा. जयभवाणी नगर गल्ली नं. १औरंगाबाद मो न ७८८८०३०४७२ आरोपी- (१)गणेश उगले, (२) निलेश भोसले, बाबुराव चाळेकर, (४) उमेश शिंदे व (५) अनोळखी एक नाव/पत्ता माहीत नाही याच्यावर (३) काल दुपारी १.३० वाजता त्याचा वर गुन्हा दाखल केला गेला आहे.

या हल्ल्याच्या निषेधार्थ परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून असे हल्ले सहन केले जाणार नाहीत. हल्लेखोरावर कडक शासन करावे, असा इशारा परळी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येत आहे. यावेळी निवेदन देत प्रसंगी पराळी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष बाबा शेख,शहराध्यक्ष प्रल्हाद कंडूकटले, भगवान साकसमुद्रे, बालाजी जगतकर,माणिक कोकाटे,दशरथ रोडे,सय्यद अफसर,अमोल सुर्यवंशी,प्रविन फुटके,संभाजी मुंडे, प्रशांत जोशी,सतिश बीयाणी,नितिन ढाकणे,महादेव गित्ते,बालाजी ढगे,वैजनाथ कळसकर, धिरज भराडीया,अनंत गित्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.