आता नगरपालिका, नगरनिगम मध्ये दिव्यांग प्रतिनिधी स्वीकृत सदस्य होणार

28

🔹राजस्थान सरकार ठरले देशातील पहिले राज्य

✒️खामगाव प्रतिनिधी{मनोज नगरनाईक}

खामगाव(दि.3जून):-राजस्थान सरकार ने दिव्यांगांना मनोनित सदस्य करण्याचा केला अध्यादेश पारित राजस्थान राज्यातील अशोक गेहलोत सरकारचा क्रांतीकारी निर्णय हा निर्णय धेणार प्रथम राज्य या निर्णयाने राज्यातील दिव्यांग बांधव आनंदीत.
नुकताच या काँग्रेसशाशित राज्याने सबका साथ सबका विकास या शब्दाला अधोरेखित केल्याचे पहावयास मिळणार आहे.
नगर पंचायत,नगरपालिका,नगरनिगम महापालिका यामध्ये नगरसेवक पदाकरिता मनोनित सदस्य बनविण्याचा निर्णय राजस्थान राज्याच्या अशोक गेहलोत सरकारने दिव्यांजनांचा समावेश करण्याचा निर्णय घेऊन त्याच्या असलेल्या स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांना स्विक्रुत सदस्य म्हणुन त्यांना स्थानिक असलेल्या संस्थेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

स्विक्रुत सदस्य निर्माण करणारे राजस्थान सरकार हे देशातिल पहिले राज्य ठरले आहे.या निर्णयाने या राज्यातिल असंख्य दिव्यांग बांधवांनी मनापासुन आभार मानले आहेत.काही महिन्यापुर्वी पुणे आयुक्तालयाने महाराष्ट सरकार कडे याचा प्रस्ताव पाठविल्यानंतरही दिव्यांग संधटनांनी हि वेळोवेळी मागणी लावुन धरल्यानंतरही या दिव्यांग घटकाला स्विक्रुत सदस्य पदासाठी अजुनही ताटकळत ठेवत असल्याचे दिसुन येत आहे.नेहमी विधायक कार्यात सदा अग्रेसर असलेला महाराष्ट यासाठी मागे पडत असल्याचे पहावयास मिळत आहे.