यादगार व्यायाम शाळे समोरील नळाची पाईप लाईन क्षतिग्रस्त

33

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.३जून):-गेल्या तीन महिन्या पासून स्थानिक नेहरू वार्ड येथील यादगार व्यायाम शाळे समोरील नळाची पाईप लाईन दोन ठिकाणी क्षतिग्रस्त झाली असल्यामुळे नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. फुटलेल्या जल वाहिन्यातुन दुषित पाणी जलवाहिन्यातुन नळाना येत असून यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आहे. शहरात एकीकडे पाण्याची टंचाई दिसून येत आहे, जनतेला पाणीटंचाईच्या झळा पोचत असून अनेक सेवाभावी संस्था,पक्ष टैंकरद्वारे पाण्याचे वाटप करीत आहे.परंतु दुसरी कडे रोज किती तरी पाणी वाया जात आहे व फुटलेल्या जलवाहिनीतुन सदोष पाणीपुरवठा होत आहे.

सदर फुटलेल्या जलवाहिनीतुन पाण्याचा व्यय होऊ नये या साठी यादगार मंडळाच्या खेळाडू राकेश झाडे ,सागर झाडे ,साई खोब्रागडे, अंकुश राऊत ,सौरभ येल्लोरे यांनी पाण्याच्या वाहत्या दिशेने नाली खोदून सर्वं झाडांना पाणी देऊन पाण्याचा दुरूपयोग तातपुरता थांबविला आहे. आता पावसाळा सुरू झाला आहे त्या मुळे आता झाडांना पावसाच पाणी मिळणार असल्याने सदर पाणी वाया जावू नये याकरिता ही समस्या लवकरात लवकर सोडवीण्याचे आवाहन संबंधित जलपूर्ती विभागास केले आहे.