शिवराज्यभिषेक दिना निमित्य आमदार श्र्वेताताई महाले यांनी केले अभिवादन

28

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

चिखली(दि.6जून):-‘स्वराज्य’ ह्या केवळ एकच विचाराने पेटून उठललेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा असा दिवस आहे. शिवरायांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ दिवशी झाला.

अठरापगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज आराध्य दैवत, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चिखली येथील पुर्णाकृती पुतळ्यास मा. आमदार श्र्वेताताई महाले – पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मा .डॉ प्रताप सिग राजपूत जिल्हा उपाध्यक्ष भाजपा , मा पंडितराव देशमुख शहराध्यक्ष भाजपा, मा विजय नकवाल सभापती आरोग्य नगर परिषद, मा डॉ कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष भाजपा , मा सुभाष अप्पा झगडे,मा संतोष काळे पाटिल तालुका अध्यक्ष युवा मोर्चा , मा सागर पुरोहित उपस्थित होते.