स्वस्त चप्पल दराने रोजगार हमी महिलांचे वेधले लक्ष्य

31

🔹ब्रम्हपुरी तालुक्यातील अर्हेरनवरगाव येथील दृश्य

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.14जून):- कोरोणाच्या मोठ्या प्रादुर्भावामुळे सरकारने कडक लॉकडाऊन ठेवल्यामुळे सर्व मार्केट लाईन बंद ठेवली होती. खेडे भागातील महिलांना काही घ्यायचं असल्यास आठवडी बाजारातून खरेदी करत असत. परंतु सर्व बंद असल्यामुळे त्यांना काही वस्तू घेता नाही आल्या.

परंतु अचानक अर्हेरनवरगाव मध्ये चप्पल विक्रते आले आणि कमी दरात चप्पल विकू लागल्याने अर्हेरनवरगाव येथील रोजगार हमी कामावर जाणाऱ्या महिलांचा चप्पल खरेदी कडे लक्ष वेधले गेले. व काही महिलांनी खूप गर्दिनिशी चप्पल विकत घेतल्या. व आपल्या रोजगार हमी कामाकडे निघून गेल्या.