येणाऱ्या विधानपरिषद निवडणूक लक्षात घेऊन धुळे नंदुरबार नगरपालिकांवर वर्चस्व प्रस्थापित करा-राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे

20

✒️प्रतिनिधी(जयदिप लौखे-मराठे,वेल्हाणे धुळे)

धुळे(दि.18जून):- येत्या डिसेंबरमध्ये धुळे नंदुरबार विधानपरिषद निवडणूका होणार आहेत त्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार निवडून यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आतापासूनच चांगलीच कंबर कसली आहे. त्याच पद्धतीने पक्षसंघटन सुरू झाले आहे मतांची गोळाबेरीज पाहता नगरसेवकांची संख्या वाढल्यास सहजरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो. येत्या काळात शहादा, साक्री, शिरपूर, दोंडाईचा नगरपालिकांच्या निवडणुका आहेत या नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करून मतांची गोळाबेरीज सुरू केली आहे.

त्याच अनुषंगाने आज मुंबईत राष्ट्रवादी भवनात २० विद्यमान सरपंच आणि ३ नगरसेवकांचा प्रवेश सोहळा पार पडला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश अध्यक्ष ना. जयंत पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशअध्यक्ष मा. मेहबूब भाई पटेल, प्रदेश उपाध्यक्ष मा. आ. अनिल गोटे. नंदुरबार निरीक्षक हंसराज महाले, नंदुरबार राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्या उपस्थितीत पार पडला.

एके काळी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ल्या होता मात्र गेल्या काळात माणसं बदलली मात्र पुन्हा एकदा अनिल गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तरुण जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड काम सुरू आहे येत्या काळात नवीन चेहऱ्यांना संधी देऊन पक्ष पुन्हा बालेकिल्ल्या सिद्ध होईल.

पक्षाच्या प्रत्येकाला न्याय मिळेल त्यासाठी विभागीय पातळीवर अडचणी भासल्यास प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे आपल्याला मार्गदर्शन करतीलच. संधी देणारा पक्ष आहे आदरणीय पवार साहेबांच नेतृत्व संबंध देशाला माहीत आहे सातपुड्यातील दरीखोऱ्यात साहेबांचा कार्यकर्ता आहे. पक्षात प्रवेश केला सर्वांच स्वागत आहेच येणाऱ्या काळात ग्रामपंचायत तसेच नागरपालिकांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकत अधिक मजबूत करा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवा असे आवाहन प्रदेश अध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांनी केले.