पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढ आणि महागाई कमी न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन छेडणार

28

✒️सिध्दार्थ ओमप्रकाश दिवेकर(तालुका,प्रतिनिधी उमरखेड)9823995466

उमरखेड(दि.6जुलै):-पेट्रोल डिझेल,स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेले आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.
पेट्रोलियम पदार्थाच्या दररोज किंमती वाढत आहेत.
कोरोना महामारी मुळे छोटे मोठे व्यासायिक आणि उद्योगधंदे बुडल्याने लाखो लोक बेरोजगार झाले, देशाच्याअर्थव्यवस्थेने निच्यांक गाठलाअसून GDP – 6% इतकी खाली आला आहे. यामुळे सर्वसामान्य गरीब माणसांचे जगणे मुस्किल झाले. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला जाण्यास केंद्रसरकार जबाबदार असून केंद्रसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई वाढली आहे आणि वाढतच आहे.सरकारच्या या धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उमरखेड तालुका जिल्हा यवतमाळच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. आमदार इंद्रनील भाऊ नाईक यांच्या मार्गदर्शनात भव्य निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले. नागचौक येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयापासून रॅली काढण्यात आली आणि तिची सांगता उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देऊन करण्यात आली.

रॅली मध्ये असलेल्या गॅस सिलेंडरची प्रेतयात्रा आणि समोर तिरडीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकरराव तालंगकर ,डॉ विठ्ठलराव कदम (जिल्हाउपाध्यक्ष)डॉ. प्रेम हनवते (जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग),बळी तात्या चव्हाण, विठ्ठलराव हनवते, प्रभाकर भीमेवार, दीपक पाटील चंदरे ,युवा नेते जाकीर राज, गुणवंत सूर्यवंशी, दता गंगासागर , अविनाश जाधव, बीबीचंद जाधव कैलास राठोड यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीमध्ये महागाई विरोधातील विविध घोषणा फलक हाती घेऊन येणाऱ्या युवा कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि चौक दणाणून गेले.

उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन जेष्ठ नेते राजुभैया जयस्वाल, डॉ विठ्ठलराव कदम, शंकरराव तालंगकर, शंकरराव जाधव, डॉ प्रेम हनवते, गुणवंत सूर्यवंशी इत्यादींनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडून केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध केला.

पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढ आणि महागाई कमी नाही झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी मंत्री मनोहरभाऊ नाईक, आमदार इंद्रनील जी नाईक, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी जाकीर राज, गुणवंत सूर्यवंशी अविनाश वानखेडे(युवक अध्यक्ष), विजय बरडे(सेक्रेटरी) ऍड. दिनेश हनवते(विधानसभा अध्यक्ष सामाजिक न्याय),संतोष सूर्यवंशी, सुरज देशमुख ,(पदवीधर सेल) अक्षय निरंतर, अविनाश असोले विजय वैद्य यांच्या सह राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.