एके काळी बुद्धिजीवी साहित्यिक देशाचे नेतृत्व करत होते.आता न्यायालय मान्यताप्राप्त गुंड

30

शेपन्न इंच छाती असलेल्या प्रधानसेवक,चौकीदाराने आदरणीय मोदी सरकारने आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला.४३ नवीन मंत्र्यांना शप्पत विधी झाला,त्यामुळे आता ७९ खासदार लोकप्रतिनिधी मंत्री झाले.मोदीजी आणि शहाजीनी आपली गुणवत्ता असलेले नवीन सहकारी निवडले. त्यातील ४२ टक्के मंत्री गंभीर गुन्हे दाखल असल्याचे धक्कादायक बातमी सर्वच वृतपत्रांच्या पहिल्या पानांवर आहे.२४ मंत्र्या वर हत्या आणि हत्याकांड घडवून आणण्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफोन्सने म्हणजेच ए डी आर ने एका ताजी अहवालात जाहीर केले.

त्यामुळेच भारतीय नागरिकांनी आणि शासन प्रशासनातील सर्वच कामगार,कर्मचारी अधिकारी वर्गाने यांची जाणीव ठेऊन कामकाज करावे.चुकूनही आंदोलनजीवी बनू नये.परिणाम वाईट होतील हे लक्षात ठेवावे.जगात ज्या देशातील बुद्धिजीवी वर्ग निर्भीड, निःपक्षपाती असला तर तो सत्ताधारी वर्गापेक्षा प्रभावशाली असतो. प्रत्येक कामाची तो सकारात्मक मांडणी करून सत्ताधाऱ्यावर अंकुश ठेवतो.कारण बुद्धिजीवी साहित्यिक,पत्रकार,संपादक हा दूरदर्शी दृष्टिकोन ठेऊन वैचारिक पातळीवर विचार करून निर्णय घेतो. म्हणूनच सत्ताधारी कोणीही असु द्या निर्णय बुद्धिजीवी वर्गच घेतो.प्रशासकीय अधिकारी आय ए एस,आय पी एस, म्हणजे अनेक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन आलेला असतो.तो भावनिक विषमतावादी समाज व्यवस्थेचा पुरस्कार करून निर्णय घेऊ शकत नाही. त्याला भारतीय संविधानाच्या कायदे, कलमाच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यावा लागतो.

आज भारतात एकच व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी सर्व निर्णय घेतांना दिसतात.ते खरे आहे काय?. तर शंभर टक्के खरे नाही.कारण मोदी हा भाजपचा मुख्य चेहरा आहे.बाकी सर्व यंत्रणा आर एस एस प्रणित बुद्धिजीवी वर्ग आणि अदानी,अंबानी आपल्या बिजनेस माईंडच्या वर्गा कडून देशातील नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या करार,टेंडर एक इंडिस्ट्रीयलच्या मालकाकडून आपल्या देशाचे तंत्रज्ञान,कच्चा माल खरेदी,विक्री करीत आहे.भारतातील उद्योगपती राज्य व केंद्र सरकारवर कायमस्वरूपी नियंत्रण ठेऊन त्यांना हवे ते कायदे करून अंमलबजावणी करीत आहेत. त्यामुळेच देशातील लोकशाही हुकूमशाहीच्या मार्गाने कायदा सुव्यवस्था,न्यायपालिका,प्रशासकीय यंत्रणा सर्व नष्ट करण्याचे अलिखित आदेश जारी करून अंमलबजावणी करीत आहेत.

त्यामुळेच देशातील बुद्धिजीवी साहित्यिक,लेखक,संपादक,पत्रकार निर्भयपणे,निर्भीड,निःपक्षपाती लिहू अथवा बोलु शकत नाही. जे बोलले त्यांचे खुलेआम खून झाले. तरी आज पर्यत गुन्हेगार,मारेकरी आणि सूत्रधार पोलीस, सी आय डी,सी बी आय कोणता ही कायदा सुव्यवस्था ठेवणारी यंत्रणा कर्तव्यदक्ष,कर्तव्यनिष्ठ पणे काम करतांना दिसली नाही.त्या विरोधात देशातील बुद्धिजीवी साहित्यिक,लेखक,संपादक,पत्रकार निर्भयपणे,निर्भीड, निःपक्षपाती लिहू अथवा बोलु शकली नाही.ही मोठी शोकांतिका आहे. हे काम देशातील सामान्य नागरिक करीत नाही.ते तर प्रत्येक वेळी देशातील बुद्धिजीवी साहित्यिक, लेखक,संपादक,पत्रकार यांनी लिहलेल्या व सांगितलेल्या विचारावर श्रद्धा ठेवून त्यांची अंमलबजावणी करतात.

कोणत्याही देशाची वैचारिक पातळी त्या देशातील बुद्धिवादी बुद्धिजीवी वर्गाच्या मान्यताप्राप्त साहित्यावर ठरते. देशावर गंभीर संकट आले तर देशातील बुद्धिजीवी साहित्यिक,लेखक,संपादक,पत्रकार निर्भयपणे,निर्भीड, निःपक्षपाती पणे नेतृत्व करतात. हा इतिहास आहे.
भारतात तीनच विचारांचे राष्ट्रीय पक्ष आहेत.त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो,लाखो संस्था,संघटना कार्यरथ आहेत. पहिली गांधीवादी काँग्रेस,दुसरी हेगडेवारवादी भाजपा, तिसरी आंबेडकरवादी बसपा आणि चौथ्या विचारांचा पण एक पक्ष आहे आणि तो देशातील बहुसंख्य कामगार चळवळीचे नेतृत्व करतो.तो कधीच विषमतावादी मनुवादी विचारांना प्रखरपणे विरोध करीत नाही. भांडवलशाही विरोधात तो प्राणपणे लढतो. पण ब्राह्मणशाही विरोधात एक शब्द ही बोलत नाही. भांडवलशाहीने केलेलं अन्याय, अत्याचार आणि शोषण त्याला दिसते.परंतु ब्राम्हणशाहीच्या जातीगत समाज व्यवस्थेमुळे होणारेअन्याय,अत्याचार आणि शोषण त्यांना दिसत नाही.तो म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट.तो असूनही दखलपात्र नाही.

म्हणूनच त्यांचे अस्तित्व काही राज्यपुरते मर्यादित आहे.
बुद्धीजीवी असने हा काही मोठा गुणधर्म नाही.बुद्धिजीवी हा मोठा सन्मान आहे,तो केवळ आपले नांव वापरून आपले साध्य पूर्ण करतो.साधन व साध्य हे बुद्धीजीवीच्या निःपक्षपाती, निर्भीडपणे मत मांडणी वर अवलंबून असते.लोकसत्ता संपादक माधव गडकरी मराठवाडा विद्यापीठाचे नांव डॉ बाबासाहेब आंबेडकर झाले तर प्रत्येकाच्या घरात आंबेडकरांचा फोटो व नांव राहील यावरच त्यांनी आपली संपूर्ण बुध्दी खर्च करून अग्रलेख लिहले.तो बुद्धिजीवी समाजात तेढ निर्माण करण्यासाठी लोकसत्ता साधनाचा पूर्ण वापर करून त्याने काय साध्य केले.तर शिवसेना,भाजपा ग्रामीण भागातील बहुसंख्य शेतकरी कुटुंबातील मागासवर्गीय,ओबीसी,आदिवासी,अल्पसंख्याक समाजाच्या घराघरात पोचवली आणि मराठा समाजाचे वर्चस्व असणारी काँग्रेस,राष्ट्रवादी गावागावातुन विस्थापित करून ठेवली.

बुद्धिजीवी हे उत्तम साहित्यिक,पत्रकार संपादक असतात.पण त्यांची मुख्य उद्धिष्ट कधीच विसरत नाही. समाजात असमानता राहिली पाहिजे, वर्णव्यवस्था नष्ट होता कामा नये यांची ते कायम दक्षता घेतात.म्हणजे शोषण करणार समाज व शोषण करून अन्याय अत्याचार सहन करणारा समाज एकाच फुटपट्टीने कसा साहित्यात मांडणार ?. म्हणजेच तो अल्पसंख्याक समाजाच्या न्याय हक्कासाठी बहुसंख्याख समाजाच्या विरोधात आपले बौद्धिक क्षमता दाखवुन बुद्धिमान बुद्धिजीवी म्हणुन मान्यताप्राप्त करून घेणार. आज देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खुलेआम खून होतांना दिसत आहे. एका गरीब निरपराध माणसाला वीस पंचवीस लोक एकत्र येऊन देश भक्तीचा नांवा वर हल्लाहल करून मारतात त्यांच्या विरोधात बुद्धिजीवी,साहित्यिक,पत्रकार,संपादक आपली बुद्धिमत्ता खर्च करतांना दिसतात काय?. त्यांनी ती प्रामाणिक पणे केली तर प्रिंट मीडिया,वृत्तवाहिन्यांवर सतत त्यावर चर्चा होऊ शकते,शासकीय, प्रशासकीय आणि सत्ताधारी पक्षाच्या मंत्रिमंडळातील सर्वांना त्यावर निर्णय घेण्यास भाग पाडू शकतात.म्हणूनच म्हणतात कधी काळी बुद्धिजीवी साहित्यिक देशाचे नेतृत्व करत होते.आता पोलीस आणि न्यायलयाने गुन्हेगार ठरविलेले लोक लोकप्रतिनिधी खासदार मंत्री म्हणून देशाचे नेतृत्व करतील.तेव्हा भारतीय नागरिकांनी त्यांना हव्या त्या योजना राबवीत असतांना आंदोलनजीवी बनू नये.

✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे, भांडुप,मुंबई(अध्यक्ष- सत्यशोधक कामगार संघटना,संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य)मो. 9920403859