माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक डांबरीकरण रस्त्याचे उद्घाटन

31

✒️गेवराई प्रतिनिधी(देवराज कोळे)

गेवराई(दि.22जुलै):- तालुक्यातील काठोडा फाटा ते काठोडा दोन किमी अंतरासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून एक कोटी आठ लक्ष रुपयांचा निधी माजी आमदार अमरसिंह पंडित व बीड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विजयसिंह राजे पंडित यांनी खेचून आणला असून नुकतेच कामाचे उद्घाटन झाले आहे

गेवराई तालुक्यातील काठोडा फाटा ते काठोडा दोन-किमी अंतरासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत एक कोटी आठ लक्ष रुपये निधी मंजूर झाला असून माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली या कामाचे काठोडा फाटा येथे नुकतेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बीड विजयसिंह पंडित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी दीपक तात्या आतकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव भाऊ पाढरे , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर आदी उपस्थित होते.

काठोडा फाटा ते काठोडा रस्ता डांबरीकरणासाठी निधी मंजूर केल्याबद्दल युवा नेते बंडू शेठ घाटुळ, सरपंच बाळासाहेब भिगले, उपसरपंच गणेश राठोड, मा उपसरपंच बाबासाहेब चव्हाण, बळीराम नाना घाटुळ, प्रकाश चव्हाण , गोळेगाव चे सरपंच सिद्धेश्वर काळे ,अर्जुन डुकरे, ज्ञानेश्वर चव्हाण, नाना कोकरे आदींनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांचा सत्कार करून आभार मानले