धरणगाव महाविद्यालयात ग्रंथपाल दिवस साजरा

29

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगाव(दि.13ऑगस्ट):-12 ऑगस्ट रोजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, धरणगाव येथे डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिवस हा “राष्ट्रीय ग्रंथपाल “दिवस म्हणून साजरा करण्यात आला.प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. टी. एस. बिराजदार, तसेच कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. आर. आर. पाटील सर यांनी केले.तत्पूर्वी कार्यक्रमाची प्रस्तावना मंगेश पाटील सर यांनी केली.

प्रस्थावना करताना पाटील त्यांनी भारतीय ग्रंथालयशास्र चे जनक असे ज्यांचा सार्थ लौकिक आहे असे डॉ. रंगनाथन यांचा जीवन प्रवासा वर प्रकाश टाकला.तसेच मद्रास येथील ग्रंथालयात ग्रंथपाल म्हणून काम करत असतांना त्यांनी ग्रंथालय विभागाची पाच सिद्धांत मांडली. त्यांना पंचसूत्री असे म्हणतात असे प्रतिपादन मंगेश पाटील सर यांनी त्यावेळी केले.

प्रसंगी महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुखदाने मॅडम, प्रा. पालखे सर,प्रा. केंद्रे सर, डॉ. संजय शिंगाने सर,डॉ. गौरव महाजन सर, डॉ. बोन्डे सर,डॉ. स्वप्नील खरे सर, प्रा. विश्वजित वळवी सर, डॉ. सदाशिव वाघमारे, प्रा. केदार, प्रा. डॉ. ज्योती महाजन, डॉ. जाधव सर, प्रा. चव्हाण सर, तसेच ग्रंथालयातील जेष्ठ कर्मचारी श्री.आर. पी अहिरराव सोबत इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तर आभार प्रदर्शन ग्रंथालय लिपिक श्री. नारायण चव्हाण यांनी केले.