घाटनांदूर येथील बौद्ध समाज स्मशानभूमी सेड पासून वंचित

85

🔸प्रशासकीय मंजूरी मिळूनही जाणीवपूर्वक उभारण्यात होतोय विलंब

🔹बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या गावातीलच हा प्रश्न …. लोकप्रतिनिधींचा याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा

✒️प्रतिनिधी अंबाजोगाई(राहुल कासारे)

अंबाजोगाई(दि.20ऑगस्ट):-बीड जिल्हातील अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर येथील बौद्ध समाजाला गेले अनेक वर्षांपासून स्मशान भुमी शेड नाही. यामुळे अंत्यसंस्कार हा उघड्यावरच केले जातात. ऐन पावसाळ्यात रिमझिम पाऊस चालू असताना आज रोजी एक वृद्ध महिलेचा मृतदेह उघड्यावर भर पावसात चिंब भिजून अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे त्याची अवहेलना झाली व नातेवाईकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. घाटनांदुर येथील सर्व समाजाला स्मशान भुमी शेड उभारण्यात आले आहे. परंतु केवळ बौद्ध समाजालाच शेड उभारण्यात आले नाही.याचे उत्तर गावातील सरपंच व उपसरपंच यांना वारंवार विचारणा केली असता पक्त उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

केवळ बौद्ध समाजलाच ञास सहन करावा लागतो हा व सदरील सामाजिक प्रश्न हा किचकट असून बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.सिरसाट यांच्याच गावातील हा विषय असून तो एक संशोधनाचा विषय आहे. अशी खंतही सामाजिक बांधवांनी व्यक्त केलेली आहे. उन्हाळ्यात रखरखते उन व पावसाळ्यात पाऊस अश्या अनेक अडचणींना तोंड देत या समाजाने अनेक वर्षे काढली आहेत. ग्रामपंचायत कडून या कामासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करावे व स्मशान भुमीत शेड बांधण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.