वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार आहे. – अशोक हिंगे पाटील

46

✒️राहुल कासारे(अंबाजोगाई ता.प्रतिनिधी)मो:-9763463407

अंबाजोगाई(दि.23ऑगस्ट):-आगामी काळात महाराष्ट्रात अनेक जिल्ह्य़ातील येणाऱ्या जि. प. पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने लढणार आहे. या मध्ये नगरपालिकेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून, कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी तयारीला लागावे.लोकसभा व विधानसभा या निवडणुका ह्या नेत्यांच्या होत्या पन नगरपालिकेच्या निवडणुका ह्या कार्यकर्ते यांच्या आहेत. येणार्‍या काळात आपण सत्तेवर जाणार आहेत. वंचित च सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकते.

मराठा आरक्षणाला सर्वात पहिल्यादा बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा दिला ओबीसींचा राजकीय आरक्षण संपवल्या नंतर आरक्षणाचा प्रश्न बाळासाहेबांनी च ऐरणीवर आणला मराठा मुस्लिम ओबीसी मधील वंचित कार्यकर्त्यांना बाळासाहेबांनी संधी देऊन न्याय मिळवून दिला आहे. आगामी काळात वंचित बहुजन आघाडी राजकिय पर्याय असणार आहे असे प्रतिपादन वंचीत चे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी अंबाजोगाई येथील आढावा बैठकीत केले यावेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडी च्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांचा मराठवाडा दौरा येत्या ४ सप्टेंबर ला बीड जिल्ह्यात आहे त्याच्या पूर्वतयारी आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी ,शाखा बांधणी,बूथ बांधणी च्या तयारी च्या आढावा साठी ही बैठक अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आली होती.

यावेळी अध्यक्षस्थानी बीड जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे, प्रमुख उपस्थिती मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील, सुरेश शेळके, रमेश गायकवाड, अनंतराव सरवदे, बबन वडमारे, मिलींद घाडगे, शैलेश कांबळे, सुरेश बचुटे, प्रसेनजीत रोडे,संजय तेलंग, सुशांत धवारे, चरणराज वाघमारे,बाबुराव मस्के,अमोल हातागळे, रामराजे सरवदे, खाजामिया पठाण, ऍड.सतीश काळम पाटील, ऍड सुभाष जाधव,संजय गवळी, निलेश साखरे, बाबा मस्के, अनिल कांबळे, मारुती सरवदे, अक्षय भूंबे, कपिल शिनगारे, उमेश शिंदे ,परमेश्वर जोगदंड, पोटभरे ताई, सरवदे ताई, धमांनद कासारे, विशाल कांबळे,गोविंद जोगदंड,स्वप्नील ओव्हाळ,सचिन वाघमारे,व बुध्दभूषण कांबळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद मस्के यांनी तर आभार प्रदर्शन राहुल कासारे यांनी केले.