रूग्णवाहीकेचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न…

27

✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो:-९९७०६३१३३२

बिलोली(दि.27ऑगस्ट):-  तालुक्यातील जनतेला तात्काळ सेवा मिळावी म्हणुन माजी आमदार सुभाषराव साबणे यांच्या वतीने ग्रामिण रूग्णालय बिलोलीला सुसज्ज रूग्णवाहीका उपलब्ध करून दिली असुन या रूग्णवाहीकेचे लोकार्पण सोहळा दिनांक २६ अॉगस्ट २०२१,रोजी बिलोली येथील हनुमान मंदीराच्या पटांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख उमेशजी मुढे तर प्रमुख पाहुणे सुभाष साबने,नागनाथ पाटील सावळीकर,विश्वनाख समन,गौसोद्दीन कुरेशी,बाबाराव रोकडे,शंकरराव मावलगे,गोविंद मुंडकर,विजय मुंडकर,लक्ष्मण जाधव आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.यावेळी माजी आमदार सुभाष साबणे यांनी केलेल्या विविध विकास कामाचा पाढा वाचण्यात आला.नागनाथ पाटील सावळीकर,गोविंद मुंडकर,गौसोदीन कुरेशी,विजय मुंडकर,लक्ष्मण जाधव यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असल्याने सार्वजिक विकास कामात सहकार्य केले पाहीजे असे मत व्यक्त केले.

माजी आमदार सुभाष साबणे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की माझे वडील मा.आ.दलीतमित्र पिराजीराव साबने यांच्या स्मरणार्थ शिवसेना कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर देगलुर प्रमाणे बिलोली येथे अॉक्सीजन बंकसह नविन रूग्णवाहीका उपलब्ध करून देण्यात आली. डीझल भरून रूग्णासाठी नांदेड,हैद्राबादला घेऊन जाता येईल व रूग्णांना कसल्याच प्रकारचा खर्च द्यावा लागणार नाही.असे मत साबणे यांनी व्यक्त केले.तसेच यावेळी शिवसेना सदस्य नोंदणी व पत्रकारांना छत्रीचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास शिवसेनेचे कार्यकर्ते व पत्रकार,शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार पवार यांनी मानले.