गोकुळाष्टमी निमीत्त महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न…..

29

✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो:-9970631332

कुंडलवाडी(दि.2सप्टेंबर):- येथील नांदेड बेस गल्लीतील खंडोबा मंदीर येथे गोकुळाष्टमीनिमीत दि.31-08-2021 रोजी कुंडलवाडी येथे गोल्ला गोलेवार समाजाच्या वतीने खंडोबा मंदिर येथे महाप्रसादाचा (भंडारा) चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर बाबुराव चरकु लवार अध्यक्ष गोल्ला गोलेवार समाज संघटना बिलोली,संजय गंगाराम चरकुलवार,परमेश्वर गजलोड यांचा सत्कार करण्यात आला.असुन यावेळी समाजाच्या अडीअडचणी बाबतची चर्चा करण्यात आली.

यावेळी विलास दिवशीकर जिल्हा उपाध्यक्ष, पिराजी येरमुलवार तालुका कार्याध्यक्ष,मकरंद मठ्ठमवार तालुका अध्यक्ष महिला प्रतिनिधी, शाखा अध्यक्ष गंगाधर सायन्ना जालावार, शाखा उपाध्यक्ष पंढरी जंगीलवार , शिवाजी कोरेवार सचिव, इरेश मोतकेवार संघटक तथा गोकुळाष्टमी उपाध्यक्ष, मारुती जालावार, मल्लेश मोतकेवार, आबांना जालावर, सायन्‍ना मठ्ठमवार,यांच्यासह समाज बांधव उपस्थीत होते.