कुंडलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास वॉटर कुलर भेट

82

✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो:-9970631332

बिलोली(दि.2सप्टेंबर)-:- तालुक्यातील कुंडलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास मौजे नागापूर येथील सदन शेतकरी संभाजी मारोतराव पाटील कदम यांच्या वतीने वॉटर कुलर भेट दिनांक १ सप्टेबर २०२१ रोजी देण्यात आले. असुन या वॉटर कुलरने आरोग्य केंद्रात येणा-या सर्व रूग्णांना थंड व गरम पाण्याची सोय उपलब्ध करून दिल्याने नागरीकांनी त्यांचा आभार व्यक्त केले आहे.

संभाजी कदम यांनी वॉटर कुलर देवून सामाजिक बांधीलकी जोपासुन त्यांनी एक आदर्श जगापूढे ठेवले आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद माहुरे,डॉ.नरेश बोधनकर,एस.डी.सावंत,अंगद मुंढे,तालुका पर्यवेक्षक बनसोडे,अमेटवार,प्रकाश गायकवाड यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थीतीत होते.