संधीचे सोने करायला शिका

27

वेळ हि प्रत्येकाला घडवण्यासाठी संधी देत असते. पन् आपण त्या वेळेला महत्व देत नाही. असे का होते?बरेच वेळा आपण समाजात पाहत असतो की प्रत्येकाला पैसा कमावण्यासाठी काही तरी सहज साधन हवे असते. आजचा तरूण वर्ग या मागे जास्त धावतांना दिसतो. कमी वेळात दुप्पट पैसा कसा कमावल्या जाईल हिचं आशा प्रत्येकाच्या मनात आज काल दाटलेली आहे. पैसा मिळतो खरे , पन् तो पैसा टिकणारा नसतो.
कोणत्यातरी माध्यमातून तो पैसा आपल्यापासून हिरावल्या जातो. समाजात वावरतांना आपल्याला अनेक पदवीधर तरूण व तरूणी दिसतात , पन् आर्थिक परिस्थिती अनुसार मिळत असलेला पैसा घर चालवण्यास पुरे होत नाही हे ही तितकेच खरे. अशा वेळी तरूण वर्ग हाती असलेली नोकरी किंवा व्यवसाय सोडून देतात आणि आपल्याला जास्त पैसा मिळेल त्या ठिकाणी धाव घेतात. पन् हे किती दिवस चालणार ? असे कित्येक तरी नोकऱ्या व कमावण्याचे क्षेत्र सोडून देतात. आपल्या आई वडिलांनी आपल्याला कष्ट करून घडवले आहे , त्यांनी मातीत घाम गाळलेला आहे , आपल्याला कष्टाचं कमावून खायला शिकवले आहे हे सर्व विसरून जातात.

खरेचं आजचा तरूण उद्याचं भविष्य उज्वल करेल का ? असे प्रश्न निर्माण होतात. एखांद्या पदवीधर तरुणाला /तरूणीला चालत आलेल्या संधीला ठोकर मारून देत असतांना दिसतात. या कारणाने आपल्या महाराष्ट्रात बेरजागारीची संख्या अधिक वाढत जातांना दिसते. कारण त्यांचे स्वप्न मोठे असतात. आपल्या जवळ आहे त्या चादरीत पाय पसरायला शिकलेला आजचा तरूण वर्ग दिसत नाही. आजच्या तरूणा जवळ पैसा तर आहे पन् तो पैसा कष्टाचा नसल्याने व्यसनाच्या आधिन गेलेला दिसत आहे. जीवनात प्रत्येकाला सुधारण्याची संधी एकचं वेळ मिळते ती वारंवार आपल्याकडे चालून येत नाही. फक्त त्या संधीला ओळखता आले पाहिजे.तसेच तरूणींमध्ये देखिल आढळून येत आहे. आजच्या काळात आणि पूर्वी च्या काळात जमिन आकाशाचे अंतर आहे असे घरातच नव्हे तर इतर लोकांमध्ये देखिल सांगत फिरतांना दिसतात. तर आत्ता तरूण आणि तरूणी यांनी जागृत व्हायला पाहिजे.

मान , मर्यादा , सन्मान जीवनात फक्त एकदाच मिळत असते. हे सर्व कमावण्यासाठी खुप काळ स्वत:ला झिजवुन घ्यावे लागते. म्हणतात ना “कमावण्यासाठी खुप काळ लागतो पन् गमावण्यासाठी एक क्षण पुरे” असेचं काही आपल्याला मिळालेल्या संधी बद्दल असते. क्षेत्र कुठले का असेना संधी चालुन येत असेल तर कधीच सोडायची नाही.
संधी मिळेल तेव्हा मिळेल पन् त्या आधी आपल्याला प्रयत्न करायला काय हरकत आहे? असे आजच्या तरुणाचे विचार आहेत.

विचार चांगले आहेत परंतू आपण वेगळ्याच दिशेने धाव घेतो त्याचे विचार आपण कधी करत नाही , म्हणून संधी देखिल आपल्यापर्यन्त पोहचत नाही..मी सर्व तरूणाना एक सांगु इच्छितो , संधीची वाट कधीच पाहू नका पन् मार्गावरुन भरकटून देखिल जाऊ नका. खरे आहे संधी तुम्हाला घर बसल्या चालुन देखिल येणार नाही तर आपल्याला त्या आधी काही तरी करुन दाखवावे लागत असते. आणि आपण जे काही करतो त्यातचं आपल्याला संधी “सोन” बनवण्याची वेळ देत असते. फक्त ती संधी ओळखता यायला हवी. मग तुमच्या जीवनाच सोन होण्यास कोणीही तुम्हाला थांबवू शकणार नाही!

शब्दशृंगार , तू फक्त माझीच

✒️लेखक:-विशाल पाटील(वेरुळकर)मो:-9307829542