”आजादी का अमृत महोत्सव” निमित्त दादेगांव येथे कायदेविषयक शिबीर संपन्न

28

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.11नोव्हेंबर):-महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण,मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांचे निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती आष्टी,वकील संघ आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.११ नोंव्हेबर २०२१ रोजी सकाळी ९ – ३० वाजता मौजे दादेगाव,ता. आष्टी येथे “आजादी का अमृत महोत्सव निमीत्त ” कायदेविषयक साक्षरता शिबीराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी मा.के.के.माने अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती आष्टी तथा दिवाणी न्यायाधीश क.स्तर आष्टी यांनी विविध कायदेविषयी तसेच शासकीय योजना विषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

तर अँड.ए.ए.जोशी सचीव विधिज्ञ संघ आष्टी,बी.एम.झांबरे,एस.एस.मुंडे गटविकास अधिकारी पंचायंत समिती आष्टी यांनी देखील मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमास अँड.आर.बी.मुटकुळे उपाध्यक्ष वकील संघ आष्टी,विधिज्ञ संघांचे पदाधिकारी,सन्माननीय सदस्य तसेच गावातील नागरिक यांनी सहभाग नोंदविला.तसेच सदर शिबीराचे सुत्रसंचलन अँड. व्ही.पी.निबांळकर यांनी केले.सदर शिबीराचा बहूसंख्य नागरिकांनी,ग्रामस्थांनी लाभ घेतला.