मानवी हक्क स्थापना दिनानिमित्य विमा सहायता व आरोग्य तपासणी कार्यक्रम साजरा…

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.14 डिसेंबर):-महाराष्ट्र राज्य सामान्य कामगार हक्क तथा विमा सहायता कार्यक्रम भारतीय लोक हक्क समिती महाराष्ट्र राज्य विभाग ब्रम्हपुरी च्या वतीने पंचायत समिती च्या सभागृहात मानवी हक्क स्थापना दिनानिमित्य कामगार हक्क मार्गदर्शन तथा भारत सरकार योजने अंतर्गत राष्टीयकृत बँक मार्फतिने सामान्य कामगार, हमाल, मजूर, स्त्री, मुली, घरकाम मोलकरणी यांचे विमा सहायता व आरोग्य तपासणी कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटक फादर चाको ब्रह्मपुरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आर .आर.भानारकर साहेब, प्रमुख अतिथी म्हणून विजय सय्याम नायक तहसीलदार, ताराचंद राऊत सहाययक महसूल तहसिल कार्यालय ब्रम्हपुरी, विनोद रंधीये बँक ऑफ इंडिया ब्रम्हपुरी, गाठे साहेब ग्रामीण रुग्णालय,गोवर्धन दोनाडकर पत्रकार ब्रम्हपुरी, अंजीला आबीलडके ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी,आदी मान्यवर उपस्थित होते. मानवी हक्क स्थापनादिनानिमित्य कामगार ,हमाल,मजूर घरकाम मोलकरणी याचे विमा सहायता व आरोग्य तपासणी कार्यक्रमात बऱ्याच गावातील लोकांनी योजनेचा लाभ घेतला आहे. मान्यवरांनी आरोग्य व प्रणालीवर योग्य प्रकारे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन पल्लवी खेत्रे व आभार प्रदर्शन गोवर्धन दोनाडकर यांनी केले. कार्यक्रम यस्वितेसाठी प्रास्तर भाजीपाले, शिवदयाल रामटेके, कोसे सर, पियुष आलंबनकर व अन्य कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य केले.