विद्यानिकेतन मध्ये वेशभूषा स्पर्धा संपन्न…..

35

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.14डिसेंबर):- विद्यानिकेतन दादावाडी परिसरात सि.बी.एस.सी.विभागाच्या वतीने इयत्ता १ ते ८ मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या दिड वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारी कालावधी नंतर शाळा सुरू झाल्याने मुलांमध्ये उत्साह दिसून येत होता.त्यामुळे वेशभुषा स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ दिसून आली.

विद्यानिकेतन स्कुल च्या प्राचार्य सपना पिट्टलवार आणि प्रभारी मिना मंगरूळकर यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. सूत्रसंचालन भावना अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सांस्कृतिक विभागाचे सिमा बोहरा यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. विद्यानिकेतन स्कुल चे अध्यक्ष राज रणजितजी पुगलिया यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे विशेषत्वाने कौतुक केले आणि प्रोत्साहन दिले.