आरोग्य भरती प्रक्रियेतील आरोग्य विभाग पेपरफुटी,हिवताप फवारणी अनुभव बोगस प्रमाणपत्र गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींना जेरबंद करून संपत्ती जप्त करा

92

✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई,विभागीय प्रतिनिधी)मो:-8080942185

अंबेजोगाई(दि.24डिसेंबर):-आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेतील आरोग्य सेवा गट क आणि ड तसेच बीड जिल्हा हिवताप कार्यालयातुन बोगस फवारणी अनुभव प्रमाणपत्र प्रकरणातील आरोपींना जेरबंद करून त्यांची व नातेवाईकांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात येऊन बेहिशोबी संपत्ती जप्त करा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२४ डिसेंबर शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले, आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, सामाजिक कार्यकर्ते संदिप जाधव, मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद बीडकर, शेख मुबीन, अमोल गायकवाड आदि सहभागी होते.

बीड जिल्ह्य़ातील आरोग्य विभागातील (एमपीडब्लु) नोकरीमध्ये मोठ्याप्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला असून आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेतील गट क, आणि गट ड पदांसाठी पाटोदा तालुक्यातील वडझरी येथील मुळ गाव असणारे सध्या वास्तव्य बीड येथील जीवन शाहुराव सानप, संजय शाहुराव सानप ,राजेन्द्र शाहुराव सानप, तसेच पेपरफुटी प्रकरणातील भुम ग्रामिण रूग्णालयातील सहाय्यक अधिक्षक राजेंद्र पांडुरंग सानप यांच्या व नातेवाईकांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करून बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात यावी तसेच गेल्या १५ वर्षापासून तसेच बीड जिल्हा हिवताप कार्यालयातुन २८ फेब्रुवारी २०२१ झालेल्या भरती फवारणी अनुभव प्रमाणपत्रे बोगस वाटप करण्यात आली असून राज्यातील विविध ५२ जणांना पात्र केले असून त्यांच्या प्रमाणपत्राच्या सत्यतेची पडताळणी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.

पाटोदा तालुक्यातील आरोग्य भरती प्रक्रियेतील तसेच हिवताप फवारणी प्रमाणपत्राची पडताळणी करा
___
सानप बंधुचे मुळगाव पाटोदा तालुक्यातील वडझरी येथील असुन वडझरी, थेरला, हनुमानवाडी, काकडहीरा, लिंबारूई, चुंबळी, आदि गावातील उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची सत्यता पडताळणी करून दोषींवर गुन्हे दाखल करा.