विनायक विज्ञान महाविद्यालयामध्ये केमिकल सोसायटी चे उदघाटन संपन्न

29

✒️प्रदिप रघुते(प्रतिनिधी अमरावती)मो:-9049587193

अमरावती(दि.21जानेवारी):-प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट द्वारा संचालित, विनायक विज्ञान महाविद्यालय, नांदगाव खंडेश्वर येथील रसायन शास्त्र विभागाने १ जानेवारी २०२२ या दिवशी सत्र २०२१-२२ च्या केमिकल सोसायटी चे उदघाटन करण्यात आले . या उदघाटन दिनाचे औचित्य साधून “रसायनशास्त्र क्षेत्रात व्यवसायातील संधी” या विषयवार एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेकरिता प्रमुख वक्ते म्हणून विनायक विज्ञान महाविद्यालयाचे श्री निलेश सु.पडोळे , विभागप्रमुख व सहायक प्राध्यापक , रसायन शास्त्र विभाग, हे होते .

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय डॉ. अलका अनंत भिसे यांनी भूषविले ,तसेच प्रमुख अतिथी डॉ सुचिता खोडके ,IQAC समन्वयक उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन व मान्यवरांच्या स्वागताने झाली. त्यानंतर केमिकल सोसायटी स्थापन करण्यामागचा उद्देश डॉ. कविता काकडे यांनी आपल्या प्रास्तविकेमध्ये स्पष्ट केला. केमिकल सोसायटी च्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करणे जेणेकरून त्यांच्यामध्ये नेतृत्व गुणांचा विकास होईल आणि त्यांना स्वतः साठी कार्यक्रम कसे आयोजित करायचे हे समजेल.

उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी केमिकल सोसायटी चे अनावरण केले व पदाधिकाऱ्यांची नावे घोषित केली. अध्यक्षपदी आचल बनसोड , बी.एस सी . भाग ३ उपाध्यक्षपदी अक्षदा धंदरे बी.एस सी . भाग २, सचिवपदी साक्षी गुल्हाने बी.एस सी . भाग ३, संयुक्त सचिवपदी नयना गोपनारायण बी.एस सी . भाग १ व खजिनदार पदी प्रतीक्षा डोनारकर बी.एस सी . भाग १ यांची नियुक्ती झाली. तसेच अध्यक्षांनी सर्वांचे अभिनंदन केले व सर्व विध्यार्थानी आपल्या जबाबदाऱ्या आत्मसात करून त्या यशस्वी रीतीने पार पाडाव्या असे आवाहन केले.या नंतर प्रमुख वक्ते श्री निलेश पडोळे,सहा. प्राध्यापक, विनायक विज्ञान महाविद्यालय,नांदगाव खं. यांनी विध्यार्थाना आपली पदवी प्राप्त झाल्यानंतर रसायन शास्त्र या विषयामध्ये रोजगाराच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहे हे समजावून सांगितले.

वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होणाऱ्या परीक्षा ,त्यांची निवड पद्धती आणि वेतन या बद्दल मार्गदर्शन केले तसेच त्यांनी ONGC, HPCL, ISRO, DRDO, FCI, IOCL, Forensic Science, MAHAGENCO, DAE अश्या विविध सरकारी व निमसरकारी कंपनी मधील नोकरी संदर्भ दिले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व विद्यार्थ्यांनी अथक प्रयत्न केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रजनी चव्हाण बी.एस सी . भाग ३, आणि आभारप्रदर्शन कु.साक्षी गुल्हाने बी.एस सी . भाग ३ हिने केले.