एकनिष्ठा जनसेवा फाऊंडेशनची शाखा सजनपुरी येथे स्थापन

34

✒️खामगाव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

खामगाव(दि.27जानेवारी):- दिनांक २६ जानेवारी रोजी सजनपुरी येथे एकनिष्ठा जनसेवा फाऊंडेशनची शाखा स्थापन करण्यात आली. सर्व प्रथम भारत मातेच्या प्रतिमेला हारफुल हळद कुंकू लावून दर्शन घेऊन देशासाठी आपल्या प्राणाची बली देऊन शहिद झालेल्या विर जवानांना श्रद्धांजली देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देशाचे विर जवान सुपुत्र विनोद गोसावी व दिनेश सावरकर हे होते या दोन्ही विर जवानांच्या हस्ते एकनिष्ठा जनसेवा फाऊंडेशन सजनपुरी येथे शाखेचे थाटात उदघाटन करण्यात आले व तसेच त्यांचे स्वागत एकनिष्ठा जनसेवा फाऊंडेशन तर्फे करण्यात आले.

सुरजभैय्या यादव यांच्यावर विश्वास ठेवून सजनपुरी येथील गब्बु गुजरीवाल, सोनु कौशल, दिलीप चौधरी, अनिल बेनिवाल, संतोष चौधरी, अमोल गिते, लखन बेनिवाल, गजानन हिंगणे, आकाश गोसावी, अनिल भगतपुरे, सचिन बेनिवाल, प्रेम भरसाकळे, बबलू भगतपुरे, मयूर तायडे, पंकज बेनिवाल, योगेश राऊत, शंकर नाईक, जय ओतारी, शिवा पाटील, भिका भगतपुरे, धनराज सावरकर, राजेश भगतपुरे, यश शर्मा, प्रतिक पाटील, ओम हुंडीवाले, नारायण सावरकर, सागर पंडीत, शंकर बेनिवाल, गणेश गोसावी, चेतन कदम, लखन सारसर, मनोज चौधरी, संदीप भगतपुरे, तुलशी भगतपुरे, संजू बेनिवाल, विनोद नाईक, अनिल रक्ताडे,किसन भगतपुरे, राजेश बेनिवाल आदि युवकांनी जनसेवा कार्यासाठी सदैव तत्पर राहु अशी शप्पथ घेत शाखा स्थापन केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सिद्धेश्वर निर्मळ यांनी केले तर आभार प्रदीप शमी यांनी मानले अशी माहिती रविंद्र दिपके यांनी दिली.एकनिष्ठा फाऊंडेशन व तसेच जय अंबे सेवा ग्रुपच्या सदस्य सजनपुरी यांची प्रमुख उपस्थिती होती.