सुदामभाऊ राठोड यांचा बन्ना फाॅऊंडेश जिवती च्या वतीने सत्कार

32

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.18फेब्रुवारी):;सुदामभाऊ राठोड यांची सामाजिक कार्याची धडपडीची दखल घेऊन गौरव पुरस्कार देण्यात आले. सुदाम राठोड हे सामाजिक क्षेत्रात २००७ पासून निस्वार्थपने काम करत आहे, त्यांनी २९ वेळा स्वतः रक्तदान केले आहे आणि त्यांच्या माध्यमातून ५००० (पाच हजार) पेक्षाही जास्त रुग्णांना रक्ताची व्यवस्था करून दिली आहे, आणि स्वतंत्र विदर्भ राज्याच्या चळवळी मध्ये २०१२ पासून विदर्भ राज्य आंदोलन समिती सोबत उत्कृष्ट अशी कामगिरी बजावत आहे.

सामाजिक क्षेत्रात गोर गरिबांसाठी आपल्याने जेवढी होईल तेवढी मदत करत आहे आणि २४ तास जनतेच्या सेवेसाठी पहाडावरील जिवतीचा हिरा सुदाम राठोड फक्त जिवतीतच नाही तर अख्या विदर्भात धडपड करत आहे,आणि स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी फार मोठी चळवळ उभी करण्याचा प्रयत्न करत आहे, या सर्व उल्लेखनीय व प्रशंसनीय काऱ्यांची दखल घेऊन बन्ना फाऊंडेशन जिवती तर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.