संकल्प फाउंडेशन रामपूर-राजुरा चा अभिनव उपक्रम

67

🔸छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त “वाटचाल कुपोषणमुक्ती कडे” या अभियानाला सुरवात

🔹संपूर्ण तालुक्यात अभियान राबविण्याचा संकल्प

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.20फेब्रुवारी):-अनेक सामाजिक संस्थांनी वेगवेगळे उपक्रम करूण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. यातच रामपूर ( राजुरा) येथील संकल्प फाउंडेशन महाराष्ट्रात च नवे तर संपुर्ण भारतात ज्या प्रमाणे कुपोषनाचा फैलाव होत आहे त्यावर नियंत्रण आणण्यासाठी ऐक खारीचा वाटा म्हणुन, कुपोषण पासून कुपोषित बालकांना मुक्तता मिळावी या साठी फाउंडेशन तर्फे रामपूर येथील कुपोषित बालकांना कुपोषित आहार किट च वाटप करण्यात आले याप्रसंगी फाउंडेशन च्या सदस्यांनी निर्धार केला की हे कुपोषणमुक्ती ही फक्त रामपूर या गावातून च नाही संपुर्ण राजुरा तालुक्यातून मुक्त झाली पाहिजे यासाठी फाउंडेशन च्या माध्यमातून समोर जाऊन हळु हळु प्रत्येक गावात या प्रमाणे संपूर्ण तालुक्यात कुपोषणमुक्ती साठी अभियान, कुपोषण वर मार्गदर्शन म्हणुन वाटचाल कुपोषणमुक्ती कडे या अभियानाला सुरवात करत आहे.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने रामपूर च्या प्रथम नागरिक सरपंच वंदना गौरकार मॅडम, उपसरपंच सुनिता उरकुडे मॅडम, ग्रामपंचायत सदस्य, लता डकरे मॅडम, सिंधु लोहे मॅडम संकल्प फाउंडेशन चे उज्वल भाऊ शेंडे, सुरज गव्हाणे, दिपक झाडे, दिनेश वैरागडे, गितेश कौरासे, अक्षय डकरे, आकाश नळे, नितीन भटारकर, श्रेयस बुटले, उत्पल गोरे, साईनाथ पिंपळशेंडे, प्रशांत पारखी, शुभम मुने तसेच सर्व अंगणवाडी सेविका उपस्थित होते, संचालन अक्षय डकरे, प्रास्ताविक सुरज गव्हाने, तर आभार उज्वल भाऊ शेंडे यांनी मानले