महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवेदनाचा धसका

34

🔹जिल्हा परिषद शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावरच्या नावात फेरबदल

🔸पुर्ण नाव हटवा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल- शेख हक्कानी

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.24फेब्रुवारी):- जिवती पंचायत समिती अंतर्गत बिट केंद्र पाटण क्षेत्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माथाडी या शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर गावातील व्यक्तीचा नाव असल्याने त्या व्यक्तीवर व शाळेचे मुख्याध्यापक यांच्यावर विभागीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिवती तालुका अध्यक्ष यांनी संवर्ग विकास अधिकारी जिवती यांना निवेदन देवून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.

सबधित व्यक्ती शिवाजी श्रीरामे यांनी रात्री अंधारात नावात बदल केला.मुख्य प्रवेशद्वारावर “शिवाजी बालाजी श्रीरामे स्कुल माथाडी”असे नाव होते.आता नाव या प्रकारे आहे. “शिवाजी बालाजी श्रीरामे गिफ्ट माथाडी” असे करण्यात आले आहे . गावातील नागरिकांनी आणि शेख हक्कानी तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी मागणी केली जो पर्यंत शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावरील शिवाजी श्रीरामे याचे नाव हटवण्यात यावे व शिवाजी श्रीरामे व मुख्याध्यापकावर कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बातमीच्या माध्यमातून करण्यात आला