नवाब मलिक यांच्या अटकेचा निषेध घोषणाबाजी

63

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.26फेब्रुवारी):-कोरपना येथे केंद्र सरकारने महा विकास आघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांना टारगेट करून इडी सीबीआय यंत्रणेचा गैरवापर करून ज्या पद्धतीने कारवाईचा बडगा उगारून मोहीम चालवली महाराष्ट्र सरकारचे कौशल्य विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक गेल्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढून चर्चेत राहत होते हेच कारण हेरून खोटे गुन्हे दाखल करून कोणत्याही प्रकारची नोटीस न देता पहाटे घरावर धाड टाकून त्यांना चौकशीच्या नावावर अटक करण्यात आली.

यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांनी कोरपना येथील टिपू सुलतान चौकात केंद्र शासनाविरुद्ध निदर्शने व घोषणाबाजी करून केंद्र सरकार व इडी विरोधात घोषणा देऊन अटकेचा निषेध करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबीद अली शिवसेनेचे अतुल आसेकर राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे अध्यक्ष सोहेल अली मंगेश तिखट सामाजिक न्याय विभागाचे धनराज जीवने विजे एन टी सेलचे तालुकाध्यक्ष प्रवीण जाधव राष्ट्रवादी शिवसेनेचे अरविंद म्हसे नागेश रामगिरवार रमेश डाकरे गोपाल मरापे प्रकाश पंधरे गौरव मेश्राम प्रभाकर टोंगे अल्पसंख्याक शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नादिर कादरी नथुजी लोंडे मंगेश कळसकर गजानन बोराडे नदीम शहा भिमराज धोटे मारुती खापणे कृष्णा कुमरे यांचेसह राष्ट्रवादी युवक कांग्रेस शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते