अखेर वादग्रस्त नाव हटणार-माथाडी येथील ठिय्या आंदोलनाला यश

29

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.4मार्च):- पंचायत समिती जिवती केंद्र पाटण अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माथाडी या शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर गावातील व्यक्तीचा नाव लिहून असल्याने माथाडी गावातील नागरिकांनी संताप व्यक्त करुन या संदर्भात मुख्य प्रवेशद्वारावरील नाव हटवण्यात यावे म्हणून रमेश आडे, दगडू श्रीरामे, माधवराव सागरे यांनी संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती जिवती, तहसीलदार, ग्राम सचिव, मुख्यद्यापक, यांना निवेदन देऊन नाव हटवण्यात यावे अशी मागणी केली होती.

ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु मागणीची दखल संबंधित प्रशासनाने घेतली नसल्याने तक्रार करता व गावातील नागरिकांनी लोकशाही मार्गाने शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ३ मार्च रोजी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली असता शाळा व्यवस्थापन समिती माथाडी यांनी तातडीची सभा घेऊन ठराव मंजूर करून लेखी पत्र दिला आपण ठिय्या आंदोलन स्थगित करावे आपली मागणी मान्य केली आहे.वादग्रस्त लोखंडी मुख्य प्रवेशद्वार हटवण्यात येईल व ग्रामपंचायतीच्या वतीने नवीन लोखंडी प्रवेशद्वार बसविण्यात येईल असा लेखी ठराव पत्र शाळा व्यवस्थापन समिती माथाडीच्या वतीने आंदोलन करत्यांना देण्यात आले.मागणी मान्य करण्यात आली आंदोलन करत्यानी शाळा व्यवस्थापन समितीचे आभार मानले व ठिय्या आंदोलन स्थगित केले