यंग चांदा ब्रिगेड तर्फे प्रियदर्शनी शाळेपासून ते वणी रोडपर्यंत मुख्य रस्त्यावर स्ट्रीट-लाईट लावण्याची मागणी

28

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घूस(दि.4मार्च):- येथील मा. आ. किशोरभाऊ जोरगेवार यांच्या यंग चांदा ब्रिगेड सामाजिक संस्थेद्वारे नगरपरिषदला निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की, प्रियदर्शिनी कन्या शाळेपासून ते वणी रोडपर्यंत प्रमुख रस्त्यावर असलेले स्ट्रीट लाईट ची योग्य व्यवस्था नाही, तरी त्या प्रमुख मार्गावरील स्ट्रीट लाईटची योग्य व्यवस्था करुन द्यावी.

अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या व अध्यक्ष – बहूजन समाज महिला शहर घुग्घूस सौ. उषाताई आगदारी यांनी केली. निवेदन देतांना सौ. ज्योत्स्नाताई मस्के, कामिनीताई देशकर, सौ. सुजाताताई देशकर, सौ. सुनीताताई चूने, सौ. ललीताताई शेवने, सौ. कविताताई पाटील, सौ. अनिताताई कोल्हे, सौ. संध्याताई ठमके, यशोधराताई पाझारे उपस्थित होत्या.