जिवती तालुक्यात आरोपाची पैज लागली की काय ?

31

🔹शासन प्रशासनाने वेळीच लक्ष देवून आरोप प्रत्यारोपाची पैज थांबवावी- सुज्ञ नागरिकांनची मागणी

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि7मार्च):- चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुका हा महाराष्ट्र राज्याच्या आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर वसलेला अतिदुर्गम डोंगराळ आदिवासी तालुका म्हणून महाराष्ट्रात ओळखला जाणारा या जिवती तालुक्यात सध्या एका मेकावर आरोप लावण्याची जणू काही पैज लागली काय चर्चेला उधाण आले. काही शासकीय कर्मचारी विरोधात काही राजकीय कार्यकर्ते आरोपांची स्पर्धा करत आहे का असा जनमानसाला प्रश्र्न पडला आहे. कोणत्याही कारणांनी एक मेकावर आरोप प्रत्यारोपाची फेरी करण्यात धन्यता मानत आहे.

महाराष्ट्र राज्यात एखादा आरोप केला जात असणार पंरतु महाराष्ट्र राज्य एकीकडे आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुका आरोप प्रत्यारोपा बद्दल एकीकडे चर्चीत झाला असल्याचे सांगितले जात आहे.निवेदन देऊन एखादा आरोप करणे चौकशीची मागणी करणे. ज्याच्या विरोधात तक्रार केली त्या कर्मचारी किंवा राजकीय कार्यकर्त्या बद्दल चर्चा करणे की मी अमुक तमुकच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार आहे. अमुक व्यक्ती ने तमुक व्यक्तीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केला की लगेच काही तरी खोटे आरोप करून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येत आहे.

वाटसाॅफ गृपवर आणि फेसबुकवर एका मेका बद्द्ल खोटे नाटे व्हिडिओ-आयडियो किलीप्स तयार करून सेंड करण्यात येत आहे.एखादा कर्मचारी किंवा कार्यकर्त्यांची काही चूक नाही. अशा व्यक्तीची कोणी बाजु मांडत असेल तर त्या व्यक्तीला धमक्या देण्याचे ही काम सुरू आहे.कोर्टा मध्ये तुझ्यावर मानहानीचा दावा करणार आहे असे मॅसेज फार्वड केले जात आहे. कितीही कोणी खोटे आरोप करत असेल तर “एक दिन सत्य की जित होती है ” तालुक्याला काही लोकांनी आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले असलेल्यांची चर्चा रंगली आहे.या आरोप प्रत्यारोपा मुळे काही अनोचीत घटना घडू नये. या कडे शासन प्रशासनाने विशेष लक्ष देवून आरोप प्रत्यारोपाची पैज थांबवावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.