जि.प. उ. प्रा. शाळा जिवती येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

30

✒️जिवती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

जिवती (दि. 8 मार्च):-दि. 8 मार्च रोजी जि. प. उ. प्रा. शाळा जिवती येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक श्री ली टी चव्हान तर प्रमुख अतिथी म्हणून रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(खोब्रागडे) तालुका अध्यक्ष श्री कृष्णा चव्हाण उपस्थित होते.सर्वप्रथम कांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक शिक्षिका कु. योगिता उपरे मॅडम यांनी केले. महिला दिन साजरा करण्यामागची पार्श्वभूमी थोडक्यात त्यांनी प्रास्ताविकातून स्पष्ट करून सांगितली.

शाळेतील सहाय्यक शिक्षिका कु आर्जुमनबानो शेख यांनी आपल्या मनोगतातून स्त्रियांच्या वास्तविक स्थितीबद्दल आपले विचार मांडले.
तसेच तमाम अडचणींवर मात करून आपली स्वप्ने व इच्छित ध्येय पूर्ण करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावे व जगात नावलौकिक मिळवावे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. तसेच वर्ग सातवी मधील कु. अश्विनी नागनाथ मुळकंटे व गोविंद विरेंद्र शर्मा या विद्यार्थ्यांनी महिला दिनाविषयी भाषण दिली. शाळेतील शिक्षक व शिक्षिकांना भेटवस्तू देण्यात आली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील विषय
शिक्षक श्री ऋषी मेश्राम सर, श्री हिशोद तूरे सर,सौ आशा बेलादी मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षिका के प्रभावता
हिरादेवे मॅडम यांनी केले.कार्यक्रमाला शाळेतील विषय शिक्षक श्री शिवाजी राठोड सर, श्रीगडे सर,श्री जाधव सर,लाडेकर मॅडम, शा.घो आहार स्वयंपाकी, अंगणवाडी सेविका व तीन मान्यवर उपस्थित होते.