चंद्रपूर भारतीय मजदूर संघातर्फे जागतिक महिला दिवस साजरा

28

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.9मार्च):-भारतीय मजदूर संघ चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रमोद येलचलवार यांनी भारत मातेचा प्रतिमेला द्विपप्रवलजन, पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.महिला अतिथी अश्विनीताई दाने यांनी जागतिक महिल्या दिवसाचा प्रबोधन व मार्गदर्शनातून सांगून पुढील कार्यक्रम आयोजित करून सुरू करण्यात आले.

त्यानंतर महिल्यानी आपली शक्तिप्रदर्शन करीत नृत्यगायन, संगीत खुर्ची व इतर अनेक जनजागृतीपर मिशाल एक भारतीय मजदूर संघ चंद्रपूर कार्यालयात साजरा करून संपन्न करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहूणे भारतीय मजदूर संघ चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रमोद येलचलवार, माजी जिल्हाध्यक्ष अशोक मांडवकर,जिल्हामहामंत्री प्रविण मुनगंटीवार, जिल्हा प्रभारी विवेक अल्लेवार, भा.को.ख.म.संघ वर्धावॅलीचे अध्यक्ष देशमुख व भारतीय मजदूर संघ शेकडो महिला कार्यकते उपस्थित होते.