प्रा राम मेघे इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, बडनेरा द्वारे जागतिक ग्राहक दिनानिमित्य “प्रचार व प्रसार कार्यक्रम” चे आयोजन

30

✒️बडनेरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

बडनेरा(दि.16मार्च):-प्रा राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, बडनेरा- अमरावती येथील राष्ट्रीय सेवा योजना आणि रेड रिबीन क्लब द्वारे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत “Tackle Plastic Pollution.” या थीम नुसार जागतिक ग्राहक दिन प्रचार व प्रसार कार्यक्रम चे आयोजन करण्याचे ठरवली आहे. परिसंस्था सध्या एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक मुळे विविध समस्यांना तोंड देत आहे. महासागरांमध्ये प्लास्टिक वाढत आहे. त्यामुळे ग्राहक दिन साजरा करत असताना प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी ही थीम निवडण्यात आली.

सदर कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे कि “Tackle Plastic Pollution.” या थीम वर आधारित रांगोळी, पोस्टर, निबंध, चित्रकला कृती अथवा स्लोगन तयार करून (A4 साईझच्या पेपर वर) महाविद्यालयाला सादर केल्यास निवडक कलाकृती हि महाविद्यालयाच्या नोटीस बोर्ड वर लावण्यात येईल तसेच कॉलेज साईट आणि अधिकृत सोशिअल मीडिया हॅन्डल वरून (व्हाट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम, इ.) प्रसार व प्रचार करण्यात येईल.

सदर कार्यक्रमाची संकल्पना रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. आशिष सायवान यांनी दिली तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन रासेयोच्या महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. अनुराधा इंगोले, रासेयोचे सह-कार्यक्रम अधिकारी प्रा अतुल डहाने, प्रा. शुभम कदम, प्रा. गायत्री बहिरे, प्रा आशुतोष उगवेकर, श्री. निशांत केने तसेच रासेयो गटप्रमुख मुलगा चि आमिर फराझ आणि गटप्रमुख मुलगी कु. श्रेया बोरकर तसेच रासेयो दूत आयुष भगत, राजस तिखे, प्रथमेश खंडेलवाल, राणी बदरके, साद अहमद, वैष्णवी सोलव, गरिमा खत्री या सर्वांनी महाविद्यालय परिसरात कार्यक्रमाचा प्रसार व प्रचार करीत सहभाग दिला. सदर कार्यक्रमाला शासन निर्देशित सर्व कोविड नियमांचे पालन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. अली यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीनजी धांडे, उपाध्यक्ष अॉड. उदयजी देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. हेमंतजी देशमुख, सचिव युवराजसिगजी चौधरी, सन्माननिय सदस्य शंकररावजी काळे, नितीनजी हिवसे, सौ. रागिनीताई देशमुख, डॉ. सौ. वैशालीताई धांडे व डॉ. सौ. पुनमताई चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या.