गडचिरोली जिल्हा खुले कारागृह येथे एच आय व्ही एड्स संवेदिकरण कार्यक्रम

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.22मार्च):-आज दिनांक 22 मार्च रोजी गडचिरोली जिल्हा खुले कारागृह वर्ग-१ येथे कारागृह अधिकारी,कर्मचारी तसेच बंदी यांच्यासाठी एच आय व्ही एड्स संवेदिकरण कार्यक्रम घेण्यात आला.संवेदिकरण कार्यक्रमास 18 अधिकारी-कर्मचारी व 12 कैदी असे एकूण 30 जण सहभागी झाले होते.

कार्यशाळेत कारागृह अधीक्षक श्री. निमगडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.भडके, जिल्हा कार्यक्रम अधिकारी,जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग गडचिरोली, महेश भांडेकर,कु.सविता वैद्य, श्रीकांत मोडक समुपदेशक आयसीटीसी सा.रु.गडचिरोली,श्री किशोर रामटेके समुपदेशक, यांनी जिल्हा कारागृह वर्ग-१,मध्ये उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उपलब्ध सेवा केंद्रे त्या मार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा समुपदेशनाचे महत्त्व,तपासणी,उपचाराचे महत्व,आंतर विभाग समन्वय या बाबतचे मुद्दे,सहभागी कडून अपेक्षित असलेले सहकार्य, 1097 याबद्दलची माहिती व प्रश्न उत्तरे द्वारे शंका समाधान करण्यात आले .